‘I Quit! ‘त्या’ दोघांना शिक्षा झाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती नाही….वैशाली ठक्करच्या डायरीत आणखी काय?

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'I Quit! 'त्या' दोघांना शिक्षा झाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती नाही....वैशाली ठक्करच्या डायरीत आणखी काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 9:53 AM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिच्या आत्महत्या (Vaishali Thakkar Suicide) प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांना तिच्या मृतदेहाच्या बाजूला एक सुसाइड नोट सापडली. त्यात तिने आयुष्य संपवण्याचा एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याचा अंदाज येऊ शकतो. कालपर्यंत तिने एक्स बॉयफ्रेंडच्या (Boyfriend) त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आज सुसाइड नोटमध्ये तिने अन्य दोघांची नावं लिहिल्याचं उघड झालंय.

वैशालीने मध्य प्रदेशाची राजधानी इंदौर इथल्या साईबाग कॉलनीत रविवारी आत्महत्या केली. फॅनला दोर अडकवून गळफास घेत तिने आत्महत्या केली. तिच्या डायरीतले अखेरचे शब्द वाचताना कुणालाही धक्का बसेल.

वैशालीने डायरीत आई आणि वडिलांची माफी मागितली आहे. मी एक चांगली मुलगी होऊ शकले नाही, मला माफ करा.. अशा आशयाचा मजकूर गिलिलाय.

तर याच मजकुरात राहुल नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख केलाय. ही व्यक्ती तिचा शेजारी असल्याचं म्हटलं जातंय. राहुल आणि त्याची पत्नी दिशाचंही नाव आहे.

अडीच महिने या दोघांनी तिला मेंटली टॉर्चर केल्याचं डायरीत म्हटलंय. या दोघांनाही शिक्षा देण्याची विनंती वैशालीने केली आहे.

प्लीज राहुल आणि तिच्या पत्नीला शिक्षा मिळवून द्या, नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही… एवढंच नाही तर आई-वडिलांना तिने लिहिलंय… तुमची मुलगी नसेल तर तिच्यापासूनचे त्रासही संपून जातील. मला माफ करा…

Vaishali

वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणी पोलीस कमीशनर हरी नारायण मिश्र यांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, सुसाइड नोटमध्ये एक्स बॉयफ्रेंडसह अभिनेत्रीच्या शेजाऱ्याचेही नाव आहे.

रात्री उशीरा पोलिसांनी राहुल आणि दिशाला ताब्यात घेतलं. राहुल आणि त्याच्या पत्नीवर वैशालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच आरोप आहे.

वैशालीने सहा दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाउंटवरून एक रील शेअर केली होती. त्यात फक्त सिलिंग फॅन दिसत होता. त्यातूनही तिने आत्महत्येचा संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.