Yami Gautam : यामी गौतमने दिली ‘गुड न्यूज’, अभिनेत्रीच्या घरी लवकरच हळणार पाळणा !

Yami Gautam Pregnant : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली यामी गौतम हिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. यामी प्रेग्नन्ट असून लवकरच तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तिने दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी 2021 लग्न केले होते.

Yami Gautam : यामी गौतमने दिली 'गुड न्यूज', अभिनेत्रीच्या घरी लवकरच हळणार पाळणा !
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 3:00 PM

Yami Gautam Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर हे बॉलिवूडमधील नामवंत कपलपैकी आहेत. बऱ्याच वेळा ते एकत्र स्पॉट होतात. यामीचे अनेक चाहते असून त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. यामी गौतम ही गरोदर आहे. लवकरच यामी आणि आदित्य धर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. याच वर्षी तिच्या घरी बाळाचे आगमन होईल. रिपोर्टनुसार, यामीच्या प्रेग्नन्सीला साडेपाच महिने झाले आहेत. मात्र असं असलं तरी यामी आणि आदित्य या दोघांनीही या बातमीबाबत अजूनही मौन राखणंच पसंत केलं आहे. त्यांनी ही गुड न्यूज अधिकृतरित्या कोणाशीही शेअर केलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, यामीला जेव्हा प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली तेव्हापासूनच ती प्रचंड खुश आहे. येत्या मे महिन्यात तिची डिलीव्हरी होऊ शकते. ती व तिच्या कुटुंबियांनी अद्याप ही बातमी सगळ्यांपासून गुप्त ठेवली आहे.

प्रेग्नन्सीची बातमी आली होती समोर

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीत यामी आणि तिचा पती, दिग्दर्शक आदित्य, हे दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र तेव्हापासूनच तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरू झाल्या. कारण तेव्हा ती तिच्या ओढणीने पोट झाकताना दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, यामी आणि आदित्या दोघेही लवकरच ही प्रेग्नन्सीची ही ‘गुड न्यूज’ सर्वांसोबत शेअर करतील, कारण येत्या काळात ती तिच्या थ्रिलर फिल्मचे प्रमोशन करणार आहे.

आर्टिकल 370 मध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्यने केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज होणार असून 23 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, यामी आणि आदित्य चित्रपटाचे प्रमोशन सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या प्रेग्नन्सीची घोषणा करतील.

यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह 4 जून 2021 रोजी झाला. त्या दोघांनींही 2 वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही उरी: सर्जिकल स्ट्राइकच्या सेटवर भेटले आणि तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडले. आदित्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता लग्नाच्या 3 वर्षानंतर हे जोडपं आई-वडील होणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.