Bollywood Actresses connection Underworld : खऱ्या आयुष्यात या अभिनेत्री पडल्या डॉनच्या प्रेमात, उद्ध्वस्त करून बसल्या करिअर!

Bollywood actresses relationship With Underworld : काही अशा अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटात नाही तर खऱ्या आयुष्यात खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात पडल्या होत्या. पण या अभिनेत्री गँगस्टरच्या प्रेमात पडल्या खऱ्या पण नंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

Bollywood Actresses connection Underworld : खऱ्या आयुष्यात या अभिनेत्री पडल्या डॉनच्या प्रेमात, उद्ध्वस्त करून बसल्या करिअर!
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 10:16 PM

मुंबई : प्रेमात माणूस आंधळा होतो असं म्हटलं जातं, मग प्रेमात लोक रंग, जात, पैसा असं काहीही पाहत नाहीत. कारण प्रेमात माणूस इतका आंधळा झालेला असतो कि त्याला त्या व्यक्तीशिवाय दुसर काहीच आवडत नाही. तर चित्रपटांमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या लव्हस्टोरीज पाहिल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री गँगस्टरच्याही प्रेमात पडल्याचं आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहितीये का की काही अशा अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटात नाही तर खऱ्या आयुष्यात खऱ्या गँगस्टरच्या प्रेमात पडल्या होत्या. पण या अभिनेत्री गँगस्टरच्या प्रेमात पडल्या खऱ्या पण नंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तर आता या अभिनेत्री आहेत तरी कोण याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री ममता कुलकर्णी ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुलकर्णी ही डॉन दाऊद इब्राहिमचा गुंड छोटा राजनच्या प्रेमात पडली होती. ती काही वर्ष छोटा राजनला डेट करत होती. मात्र, जेव्हा छोटा राजननं भारत देश सोडला होता त्यानंतर ममता आणि त्याचं नातं संपुष्टात आलं. छोटा राजन नंतर ममता ड्रग माफिया विकी गोस्वामीला डेट करत असल्याचं म्हटलं जातं होतं.

मोनिका बेदी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटासोबतच मोनिका बेदी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. कारण मोनिकाचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत जोडले जात होते. तसंच मोनिका आणि अबू सालेमनं लग्न केल्याचेही म्हटलं जात होतं. पण या नात्यामुळे मोनिका अडचणीत सापडल्या होत्या. त्यांना अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागली होती.

अभिनेत्री अनिता अयुब ही सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनिताचं नाव हे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद सोबत जोडलं जात होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक जावेद सिद्दीकी यांनी अनिताला चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिला होता त्यामुळे जावेद यांच्या मृत्यूमागे दाऊदचा हात असल्याचं म्हटलं जात होतं.

अभिनेत्री सोना ही अभिनेत्री मधुबालासारखीच असल्याचं बोललं जात होतं. सोनाच्या सौंदर्याने हाजी मस्तान वेडा झाल्याचं बोललं जातं. हाजी मस्तान आणि अभिनेत्री सोना यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. सोना आणि हाजीचेही लग्न झाले. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ हा सिनेमा या जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राम तेरी गंगा मैली आणि डॉन दाऊद इब्राहिममुळे कायम सर्वांच्या आठवणीत आहे. मंंदाकिनीने दाऊदसोबतचं नातं कधी स्वीकारलंन नाही मात्र तिचा दाऊदसोबतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला करिअरमध्ये फार काही संधी मिळाली नाही आणि जवळपास इथेच तिच्या करिअरच्या अस्ताला सुरूवात झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.