सुपरहीट सिनेमे दिल्यानंतर उद्ध्वस्त झालं सेलिब्रिटींचं करियर; अदा शर्मा देखील होणार सिनेविश्वातून गायब?
'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मा होणार इंडस्ट्रीतून गायब? 'या' सेलिब्रिटींप्रमाणे होणार अदाचं करियर उद्ध्वस्त? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या करियरची चर्चा...
मुंबई : सध्या सर्वत्र अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाने आतापर्यंत १७१.०९ कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा २०२३ मधील दुसरा सुपरहीट सिनेमा ठरला आहे. सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे… पण एक सुपरहीट सिनेमा दिल्यानंतर अदा इंडस्ट्रीतून गायब होणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे.. याआधी देखील अनेक कलाकार सुपरहीट सिनेमांमध्ये झळकल्यानंतर सेलिब्रिटी झगमगत्या विश्वातून गायब झाले. जाणून घेवू इंडस्ट्रीतून गायब झालेल्या सेलिब्रिटींबद्दल..
अभिनेता उदिता गोस्वामी – ‘अगर तुम मिल जाओ’ गाण्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री उदिता गोस्वामी हिने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर आहे… पण आजही उदिता गोस्वामी हिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
अभिनेता जायद खान – ‘मै हूं ना’ सिनेमाच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीस आलेला अभिनेता जायद खान आता झगमगत्या विश्वापासून दूर आहे. ‘मै हूं ना’ सिनेमानंतर जायद याच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली. पण आता अभिनेता अभिनयापासून दूर आहे…
अभिनेत्री नम्रता शिरोडकर – ‘वास्तव’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली नम्रता शिरोडकर आता बॉलिवूडपासून दूर आहे… ‘वास्तव’ सिनेमात अभिनेत्रीने अभिनेता संजय दत्त याच्यासोबत स्क्रिन शेअर केली… आता बॉलिवूडपासून दूर असलेली नम्रता सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
अभिनेता फरदीन खान – ‘हे बेबी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला अभिनेता फरदीन खान याचं देखील करिअर उद्ध्वस्त झालं. अभिनेता पुन्हा कधी सिनेमांमध्ये दिसलाच नाही… पण आजही अभिनेत्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.
अभिनेत्री तनुश्री दत्ता – ‘आशिक बनाया आपने’ सिनेमातून प्रसिद्धी झोतात आलेली तनुश्री आता बॉलिवूडपासून दूर आहे. फार कमी कालावधीत सिनेमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे घर केलं. पण आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे. शिवाय काही वर्षांपूर्वी अभिनेत्री ‘मी टू’ मोहिमेमुळे तुफान चर्चेत आली होती..
अभिनेत्री अदा शर्मा – सध्या सर्वत्र अभिनेत्री अदा शर्मा हिच्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई देखील करताना दिसत आहे. पण याआधी सुपरहीट सिनेमांमध्ये झळकल्यानंतर सेलिब्रिटी झगमगत्या विश्वातून गायब झाले. त्यामुळे अदा शर्मा देखील इंडस्ट्रीमधून गायब होणार तर नाही ना? अशी चर्चा सध्या रंगत आहे..