अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदे यांच्या आवाजात ‘प्रभू श्रीराम’ गाणं

अयोध्येतील राम मंदिराचा उद्धाटन सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. 22 जानेवारी रोजी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यापूर्वी राम भक्तांसाठी एक विशेष गाणं भेटीला आलं आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदे यांच्या आवाजात 'प्रभू श्रीराम' गाणं
आदर्श शिंदे यांच्या आवाजात दमदार गाणं 'प्रभू श्रीराम' Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 9:45 AM

मुंबई : 10 जानेवारी 2024 | अयोध्या इथं प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्‌घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचं औचित्य साधत प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा लाँच करण्यात आला आहे. अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला आता असे या गाण्याचे शब्द आहेत. या गाण्याला असलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे. प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे.या गाण्याची संकल्पना साईनाथ राजाध्यक्ष यांची आहे. विपुल शिवलकर यांच्या गीताला ऋषी बी. यांनी संगीतबद्ध केलं आहे.

ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत. अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे रामभक्तांच्या उत्साहाला नक्कीच उधाण येणार आहे.

पहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे सोहळ्याची आभा आणखी वाढेल. 1 लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती या सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही उपस्थिती असेल. याशिवाय धार्मिक नेते, संत, राजकीय व्यक्ती, कलाविश्वातील सेलिब्रिटी आणि इतर मान्यवरांचाही समावेश असणार आहे.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.