‘मला सुशांत सिंह राजपूत नाही व्हायचंय’; आदिल दुर्रानीने केली राखी सावंतची पोलखोल?

राखीने मीडियाशी बोलताना असा दावा केला होता की आदिलचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे आणि तो तिला घटस्फोट देण्याची धमकी देतोय. या सर्व आरोपांवर आता आदिलने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने राखीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

'मला सुशांत सिंह राजपूत नाही व्हायचंय'; आदिल दुर्रानीने केली राखी सावंतची पोलखोल?
'मला सुशांत सिंह राजपूत नाही व्हायचंय'; आदिल दुर्रानीने केली राखी सावंतची पोलखोल? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 1:28 PM

मुंबई: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या लग्नावरून सुरू असलेला ‘हाय वोल्टेज ड्रामा’ काही संपण्याचं नाव घेत नाहीये. राखीने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतच्या लग्नाचे फोटो दाखवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हापासून ती कधी आदिलवर आरोप करताना तर कधी त्याच्यासाठी रडताना दिसतेय. नुकतंच राखीच्या आईचंही निधन झालं. या कठीण काळात आदिल त्याच्या पत्नीसोबत प्रत्येक ठिकाणी दिसला. मात्र आईच्या निधनाच्या चार दिवसांनंतर पुन्हा नेटकऱ्यांना काहीतरी वेगळंच पहायला मिळालं.

राखी सावंत गेल्या बऱ्याच दिवसांपासून मीडियासमोर ढसाढसा रडताना दिसत आहे. यादरम्यान तिने आदिलवर अनेक गंभीर आरोपसुद्धा केले होते. मात्र नंतर अचानक तिच्या आणि आदिलच्या नात्यात सर्वकाही आलबेल असल्याचं ती म्हणू लागली आणि पतीवर कौतुकाचा वर्षाव करत होती. शनिवारी सकाळपर्यंत आदिलवर बरेच आरोप करणारी राखी अचानक त्याला जगातील सर्वांत चांगला माणूस म्हणू लागली.

या सर्व वादादरम्यान आता आदिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीच्या आरोपांवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. राखीने मीडियाशी बोलताना असा दावा केला होता की आदिलचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरू आहे आणि तो तिला घटस्फोट देण्याची धमकी देतोय. या सर्व आरोपांवर आता आदिलने मौन सोडलं आहे. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने राखीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

आदिलची पोस्ट

‘मी जर एखाद्याच्या मागून बोलत नसेल तर याचा अर्थ असा नाही की मी चुकीचा आहे. मी माझ्या धर्माचा आदर करतो आणि मला महिलांचाही आदर करता येतो. जर मी मौन सोडलं आणि सांगितलं की माझ्यावर कोणती परिस्थिती आली आहे आणि ती माझ्यासोबत काय काय करतेय तर ती बोलण्याच्या लायकीची राहणार नाही. म्हणूनच ती रोज तुमच्यासमोर येते आणि सांगते की आदिल वाईट आहे’, असं त्याने लिहिलं.

या पोस्टमध्ये आदिल पुढे लिहितो, ‘ज्या पद्धतीने तिने म्हटलं की ती फ्रीजमध्ये राहणार नाही, त्यावर मीसुद्धा बोलू शकतो की मला सुशांत सिंह राजपूत नाही व्हायचंय. ती मला म्हणते की आदिल मुंबई माझी आहे, इथे काहीही होऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की सत्य जाणून घेतल्याशिवाय माझ्याबद्दल कोणतंही मत बनवू नका. कोण काय आहे हे योग्य वेळीच समोर येईल.’

‘माझ्यासारखा समजुतदार व्यक्ती, तिच्यासोबत नेहमीच उभा राहिला. तिला चांगलं लाइफस्टाइल दिलं. तिला ते सर्वकाही दिलं जे दिला पाहिजे होतं. बोलणं खूप सोपं असतं पण मी मुंबईत एक रुपया घेऊन आलो होतो. खूप छान राखी. तू तुझ्या प्लॅनला खूप चांगल्या प्रकारे पूर्णत्वास नेलंस, पण तुझी पद्धत स्मार्ट नव्हती’, अशा शब्दांत त्याने राखीवर टीका केली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.