Adipurush | ‘आदिपुरुष’मधील या 5 डायलॉग्सवर भडकले नेटकरी; अखेर निर्मात्यांनी घेतला बदलण्याचा निर्णय

सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

Adipurush | 'आदिपुरुष'मधील या 5 डायलॉग्सवर भडकले नेटकरी; अखेर निर्मात्यांनी घेतला बदलण्याचा निर्णय
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 5:44 PM

मुंबई : ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रामायण कसं दाखवू नये याचं उदाहरण सादर केल्याची टीका अनेकांनी सोशल मीडियावर केली. या चित्रपटातील व्हिएफएक्स, कलाकारांचा वेश आणि त्यांच्या तोंडी असलेले संवाद यावरून निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाला प्रचंड ट्रोल केलं जातंय. याच ट्रोलिंगनंतर अखेर त्यातील काही डायलॉग्स बदलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिपुरुषमधील काही डायलॉग्स प्रेक्षकांना खटकले असून त्यावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. हे डायलॉग्स नेमके कोणते आहेत, ते पाहुयात.. चित्रपटातील एका सीनमध्ये रावणाचा मुलगा इंद्रजीत हा बजरंग बलीच्या शेपटीला आग लावतो. त्यावेळी तो म्हणतो, “जली ना? अब और जलेगी.. बेचारा जिसकी जलती है, वही जानता है”

  1. इंद्रजीतच्या या डायलॉगवर बजरंग बली म्हणतो, “कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की”
  2. अशोक वाटिकेत जेव्हा बजरंग बली सीतेला भेटण्यासाठी येतो, तेव्हा रावणाचा एक राक्षस त्याला पाहून म्हणतो, “तेरी बुआ का बगीचा है क्या, जो हवा खाने आ गया”
  3. या चित्रपटात बजरंग बलीच्या तोंडी असलेला आणखी एक डायलॉग म्हणजे, “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे”
  4. युद्धादरम्यान लक्ष्मणावर जेव्हा इंद्रजीत वार करतो, तेव्हा म्हणतो, “मेरे एक सपोले ने तुम्हारे इस शेष नाग को लंबा कर दिया. अभी तो पूरा पिटारा भरा पड़ा है”
  5. अशोक वाटिकेत सीतेची भेट घेतल्यानंतर जेव्हा बजरंग बली श्रीरामाकडे परततो, तेव्हा ते सीतेविषयी विचारतात. “जानकी कैसी है”, असा प्रश्न विचारल्यावर बजरंग बली म्हणतो, “जीवित है”

सोशल मीडियावरील प्रचंड ट्रोलिंगनंतर अखेर या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील वादग्रस्त डायलॉग्स बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. टी-सीरिजच्या अधिकृत प्रवक्त्याने याबाबतची माहिती दिली आहे. त्याचसोबत संवादलेखक मनोज मुंतशीर यांनीदेखील ट्विट करत डायलॉग्स बदलणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘मी आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांनी ठरवलंय की जे संवाद तुम्हाला खटकले आहेत, त्याविषयी आम्ही अभ्यास करू आणि या आठवड्यात सुधारित संवाद चित्रपटात समाविष्ट करू’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याच ट्विटमध्ये त्यांनी टीकाकारांवर नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.