Prabhas Wedding: प्रभास कधी लग्न करणार? वेडिंग प्लॅनबद्दल सोडलं मौन, उत्तर ऐकून व्हाल थक्क!

'बाहुबली' प्रभासने सांगितला लग्नाचा प्लॅन; सलमान खानशी आहे खास कनेक्शन

Prabhas Wedding: प्रभास कधी लग्न करणार? वेडिंग प्लॅनबद्दल सोडलं मौन, उत्तर ऐकून व्हाल थक्क!
Prabhas
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 10:23 AM

हैदराबाद: ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. गेल्या काही दिवसांत प्रभासचं नाव बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनशी जोडलं गेलं. हे दोघं लवकरच लग्न करणार आहेत, अशी जोरदार चर्चा होती. मात्र क्रितीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता खुद्द प्रभासनेच त्याच्या लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.

लग्नाबद्दल काय म्हणाला प्रभास?

‘अनस्टॉपेबल’ या तेलुगू टॉक शोमध्ये प्रभासने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमधील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो त्याच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. नंदमुरी बालकृष्ण हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. त्यांनी या शोमध्ये प्रभासला त्याच्या लग्नाबद्दल विचारलं.

हे सुद्धा वाचा

“नुकतंच या शोमध्ये शारवानंदने हजेरी लावली होती. त्याला मी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला असता, प्रभासने लग्न केल्यानंतर करणार असल्याचं उत्तर त्याने दिलं. त्यामुळे आता तुला सांगावं लागेल की तू लग्न कधी करतोयस”, असं बालकृष्ण म्हणाले.

त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर प्रभासने स्मार्ट पद्धतीने दिलं. “जर शारवानंदने असं सांगितलं असेल की माझ्यानंतर तो लग्न करेल, तर मला असं म्हणायला हवं की मी सलमान खानच्या लग्नानंतर लग्न करेन.”

View this post on Instagram

A post shared by ahavideoin (@ahavideoin)

प्रभासच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण प्रभासच्या स्मार्ट उत्तराचं कौतुक करतायत. तर काही जणांना त्याच्या विनोदाचा टायमिंग प्रचंड आवडला. या शोमध्ये प्रभास त्याचे काका कृष्णम राजू यांच्या निधनावर बोलताना भावूकही झाला होता.

प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वादात अडकल्यानंतर आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात प्रभासने राम, क्रिती सनॉनने सीता तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतने आदिपुरुषचं दिग्दर्शन केलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.