राजघराण्यातील मुलीच्या डोळ्यात अभिनेत्री व्हायचं स्वप्न, पण वयाच्या २१ व्या वर्षी लग्न त्यानंतर तिच्यावर दुःखाचा डोंगर

राजघराण्यातील 'या' मुलीने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून केली स्वतःची ओळख निर्माण ,वयाच्या २१ वर्षी लग्न तर केलं पण त्याने नाही दिली शेवटपर्यंत साथ...

राजघराण्यातील मुलीच्या डोळ्यात अभिनेत्री व्हायचं स्वप्न, पण वयाच्या २१ व्या वर्षी लग्न त्यानंतर तिच्यावर दुःखाचा डोंगर
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 2:52 PM

मुंबई : बॉलिवूमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली पण जोडीदाराची साथ शेवटपर्यंत मिळाली नाही. काही अभिनेत्रींचं ब्रेकअप झालं तर, काही अभिनेत्रींनी लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. अभिनेत्रींना शेवटपर्यंत बॉयफ्रेंड आणि पतीची साथ मिळाली नाही. ‘दिल्ली 6 (Delhi-6) फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्यासोबत देखील असचं काही झालं आहे. ‘दिल्ली 6’ सिनेमात झळकण्यापूर्वी आदितीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. पण प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात देखील अभिनेत्रीला हवं तसं यश मिळालं नाही.

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या २१ व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं जास्त काळू टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेता सत्यदीप मिश्रा याने फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासोबत लग्न केलं आहे.

हे सुद्धा वाचा

सत्यदीप आणि अदिती यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सत्यदीप आणि अदिती दोघे एकमेकांना १७ वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्या ओळखीचं हळू-हळू मैत्रीत रुपांतर झालं. त्यानंतर मैत्रीचं प्रेमात… अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर मात्र दोघांमध्ये खटके उडू लागले. म्हणून लग्नाच्या दोन वर्षांनंतर सत्यदीप आणि अदिती यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये सत्यदीप आणि अदिती यांचा घटस्फोट झाला.

अदिती राव हैदरी हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. आदितीचे आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नावे लिहिते.

अदिति राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘रॉकस्टार (Rockstar)’, ‘दास देव (Daas Dev)’ आणि ‘पद्मावत (Padmaavat) यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशलम मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षीत आसतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.