AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udit Narayan | आदित्य आणि श्वेता दहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, उदित नारायण यांचा खुलासा

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता आदित्य नारायण 1 डिसेंबरला मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत आदित्य-श्वेताने सात फेरे घेतले.

Udit Narayan | आदित्य आणि श्वेता दहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, उदित नारायण यांचा खुलासा
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 5:46 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक-अभिनेता आदित्य नारायण 1 डिसेंबरला मैत्रीण श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत आदित्य-श्वेताने सात फेरे घेतले. यानंतर 2 डिसेंबर रोजी आदित्य आणि श्वेताच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मुलाच्या लग्नानंतर आदित्य नारायणचे वडील अर्थात प्रसिद्ध गायक उदित नारायण हे सध्या खूप आनंदी आहेत. (Aditya and Shweta have been in a live-in relationship for ten years)

उदित नारायण यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुलगा आदित्य नारायण लग्नबंधणात अडकला होता. नुकतेच उदित नारायण माध्यमांशी मोकळेपणाने बोलले. त्यावेळी उदित नारायण यांनी मोठे खुलासे देखील केले. उदित नारायण म्हणाले की, आदित्य आणि श्वेता 10 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. उदित नारायण यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘माझ्या मुलाच्या लग्नासाठी सर्व मित्र आले पाहिजेत होते, ही माझी इच्छा होती. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे हे शक्य होऊ शकले नाही. मला आदित्यचे लग्न कोरोना संपल्यानंतर करण्याची इच्छा होती. मात्र, त्यासाठी आदित्य आणि श्वेताच्या घरचे तयार नव्हते. त्यांना आताच लग्न करायचे होते. “कोरोना या साथीच्या रोगामुळे बरेच लोक लग्नाला येऊ शकले नाहीत. मात्र, त्या सगळ्यांनी त्यांच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभेच्छा पत्र मिळणे ही आनंदाची बाब आहे. या पत्रात त्यांनी आदित्यला त्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा पत्रही आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही आदित्य-श्वेताला शुभेच्छा दिल्या. या सर्व शुभेच्छा माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे असे उदित नारायण म्हणाले”

पहिल्या चित्रपटाच्या सेटवर जुळले बंध… एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने मी तिच्यावर प्रेम करू लागलो, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.

संबंधित बातम्या :

Aditya Narayan | आदित्य नारायणला आजचा दिवस खूपच खास, वडिलांच्या वाढदिवशी लेक बोहल्यावर चढणार!

Aditya Narayan | गायक आदित्य नारायण बोहल्यावर चढणार, ‘या’ अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधणार!

(Aditya and Shweta have been in a live-in relationship for ten years)

पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?
भारतीय सुरक्षा संस्थांकडून अ‍ॅक्टिव्ह दहशतवादी समोर, मुख्य लीडर कोण?.
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
आज बारावीचा निकाल; निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक.
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल
यंदाही कोकणचे विद्यार्थी अव्वल; सर्वाधिक 96.74 टक्के निकाल.