‘बापाच्या पैशांवर घमंड…’, आदित्य नारायणने चाहत्याला मारलं, फोन फेकला, व्हिडीओ थक्क करणारा

Aditya Narayan : 'तो स्वतःला समजतो तरी काय...', चाहत्याला मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य नारायण याने उचललं मोठं पाऊल, व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी व्यक्त केला संताप... सर्वत्र आदित्य याच्या कृत्याची चर्चा

'बापाच्या पैशांवर घमंड...', आदित्य नारायणने चाहत्याला मारलं, फोन फेकला, व्हिडीओ थक्क करणारा
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 12:43 PM

मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज गायक उदित नारायण यांनी त्यांच्या कामगिरीमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण कायम वादग्रस्त परिस्थितीमुळे चर्चेत असतो. आता देखील आदित्य याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आदित्य एका चाहत्याला मारताना दिसत आहे. शिवाय आदित्य याने चाहत्याचा मोबाईल खेचून घेतला आणि लांब फेकून दिला. आदित्य याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदित्य याच्या वाईट कृत्याची चर्चा रंगली आहे.

आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्ट होस्ट करण्यासाठी गेला होता. यावेळी अनेक संगीतप्रेमी त्याठिकाणी उपस्थित होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आदित्य, अभिनेता शाहरुख खान याच्या ‘डॉन’ सिनेमातील गाणं गाताना दिसत आहे. याचदरम्यान, आदित्य संतापला आणि चाहत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, आदित्य याचा कार्यक्रम सुरु असताना चाहता व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. ज्यामुळे आदित्य याला राग आला आणि गायकाना सर्वांसमोर चाहत्याला मारलं आणि फोन लांब फेकून दिला. आदित्य याच्या वागणुकीवर नेटकरी कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘आदित्य नारायण याचा अडचण काय आहे?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तो स्वतःला समजतो तरी काय…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘बापाच्या पैशांवर घमंड…’ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी देखील संताप व्यक्त करत आदित्य याच्यावर निशाणा साधला आहे.

एवढंच नाही तर, चाहत्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व पोस्ट हाईड केल्या आहेत. आधी त्याचे चाहते सर्व पोस्ट पाहू शकत होते, परंतु आता त्याने इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आदित्य याची चर्चा रंगली आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.