AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday सोबत लीक झालेल्या ‘त्या’ फोटोंवर आदित्यने सोडलं मौन; म्हणाला, ‘चांगली गोष्ट आहे…’

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर खरंच एकमेकांना करतात डेट? लीक झालेल्या 'त्या' फोटोंवर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया समोर...

Ananya Panday सोबत लीक झालेल्या 'त्या' फोटोंवर आदित्यने सोडलं मौन; म्हणाला, 'चांगली गोष्ट आहे...'
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 10:36 AM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘आशिकी २’ सिनेमाच्या यशानंतर प्रसिद्धीझोतात आलेला आदित्य याच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या सर्वत्र जोर धरत आहे. रिपोर्टनुसार, अभिनेता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दोघांचे लीक झालेले फोटो पाहून आदित्य – अनन्या एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. नुकताच, आदित्य – अनन्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात गेले होते.

दरम्यान, आदित्य – अनन्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अखेर लीक झालेल्या फोटोंवर आदित्य याने मौन सोडलं आहे. अभिनेत्याच्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘ही प्रचंड चांगली गोष्ट आहे आणि ती म्हणजे मी सोशल मीडियावर नाही. पण मी याबद्दल ऐकलं आहे…’

पुढे आदित्य याला पोर्तुगाल ट्रीपबद्दल देखील विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, ‘मला ब्रेकची गरज होती. मला मुंबईतील पाऊस प्रचंड आवडतो. फिरुन आल्यानंतर जळपास एक आठवडा पाऊस पडत होता…’ सध्या सर्वत्र आदित्य रॉय कपूर याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

एवढंच नाही तर, मुंबईत आल्यानंतर देखील दोघांना डेट दरम्यान स्पॉट करण्यात आलं. आदित्य आणि आनन्या यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अनन्या गुलाबी रंगाचा ड्रेस घालून ‘बार्बी’ सिनेमा पाहण्यासाठी गेली होती. यावेळी आदित्य पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि ट्राउजरमध्ये दिसला होता.

अभिनेत्री क्रिती सनॉन हिच्या दिवाळी पार्टीमध्ये देखील अनन्या आणि आदित्य यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. शिवाय अनेक ठिकाणी अनन्या आणि आदित्या यांना स्पॉट करण्यात आलं आहे. पण दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे अनन्या – आदित्य खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही.. कळू शकलेलं नाही.

आदित्य आणि अनन्या यांच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच अनुराग बासू यांच्या ”मेट्रो इन दिनों’ सिनेमात दिसणार आहे. तर अनन्या आयुष्मान खुराना याच्यासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमात दिसणार आहे.

अनन्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.