Ashish Vidyarthi | आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत; म्हणाल्या ‘तुम्हाला दु:ख..’

आशिष यांची दुसरी पत्नी रुपाली या गुवाहाटीच्या असून उद्योजिका आहेत. कोलकातामधील फॅशन इंडस्ट्रीत त्यांचं मोठं नाव आहे. एका फॅशन शूटदरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. शूटनंतर दोघांनी एकमेकांकडून मोबाइल नंबर घेतला आणि त्यांचा संपर्क सुरू झाला.

Ashish Vidyarthi | आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत; म्हणाल्या 'तुम्हाला दु:ख..'
Ashish Vidyarthi's first and second wifeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 8:52 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. फॅशन उद्योजक रुपाली बरुआ यांच्याशी त्यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आशिष यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी असे काही पोस्ट शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांना मानसिक धक्का बसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

गेल्या 17-18 तासांमध्ये राजोशी यांनी इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केले आहेत. आपण ज्या व्यक्तीला योग्य व्यक्ती समजतो, तीच व्यक्ती जेव्हा आपलं मन दुखावते, अशा आशयाची त्यांची पहिली पोस्ट आहे. “समोरच्या व्यक्तीसाठी तुमचं महत्त्व काय आहे, असा प्रश्न योग्य व्यक्ती कधीच उपस्थित होऊ देत नाही. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला दु:ख होतं अशा गोष्टी ते करत नाहीत. लक्षात ठेवा”, अशी त्यांची पहिली पोस्ट होती.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या पोस्टमध्ये त्या मनाच्या शांतीबद्दल बोलताना दिसत आहेत. ‘तुमच्या मनातील अतिविचार आणि शंका लगेचच दूर जाऊ दे. संभ्रमाची जागा स्पष्टताने घेऊ दे. तुमचं आयुष्य शांततेने परिपूर्ण होऊ दे. बराच काळ तुम्ही धैर्याने राहण्याचा प्रयत्न केला, पण आता चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची वेळ झाली आहे. त्यावर तुमचा हक्क आहे’, असं त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

राजोशी यांनी त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये स्वत:चा एक सेल्फी पोस्ट केला आणि लिहिलं, ‘आयुष्याच्या कोड्यात स्वत: एक कोडं बनून राहू नका.’ राजोशी यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्यांना त्यांच्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला आहे. राजोशी या ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांच्या कन्या आहेत. आशिष आणि राजोशी यांचं 1990 मध्ये लग्न झालं होतं. आशिष विद्यार्थी अँड असोसिएशनच्या त्या सहसंस्थापकसुद्धा आहेत. आशिष आणि राजोशी यांना 23 वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव अर्थ विद्यार्थी असं आहे.

आशिष यांची दुसरी पत्नी रुपाली या गुवाहाटीच्या असून उद्योजिका आहेत. कोलकातामधील फॅशन इंडस्ट्रीत त्यांचं मोठं नाव आहे. एका फॅशन शूटदरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. शूटनंतर दोघांनी एकमेकांकडून मोबाइल नंबर घेतला आणि त्यांचा संपर्क सुरू झाला. चांगली मैत्री झाल्यानंतर आशिष आणि रुपाली हे एकमेकांना डेट करू लागले होते. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी अखेर 25 मे रोजी लग्नगाठ बांधली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.