AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamannaah Bhatia | विजय वर्माबद्दलच्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर तमन्नाने सांगितला लग्नाचा प्लॅन

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजयला गोव्यातील एका पार्टीदरम्यान एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. किसिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Tamannaah Bhatia | विजय वर्माबद्दलच्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर तमन्नाने सांगितला लग्नाचा प्लॅन
Tamannaah Bhatia and Vijay VarmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 8:34 AM

मुंबई : ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अभिनेता विजय वर्माबद्दलच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. हे दोघं गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आगामी ‘लस्ट स्टोरीज 2’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपटात पहिल्यांदाच तमन्ना आणि विजय एकत्र काम करताना दिसणार आहेत. विजयबद्दलचं प्रेम मुलाखतीत जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर आता तमन्ना लग्नाविषयीच्या प्लॅन्सबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

इंडिया टुडे या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “काही वर्षांपूर्वी जेव्हा मी करिअरची सुरुवात केली तेव्हा एखाद्या अभिनेत्रीचं करिअर हे फक्त आठ ते दहा वर्षांचं असायचं. त्यानुसार मी गणित केलं आणि वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत माझं लग्न झालं असेल, माझी पोरंबाळं असतील असा मी विचार केला होता. वयाच्या तिशीनंतर काय करायचं याची प्लॅनिंगच मी केली नव्हती. त्यामुळे आता खरंच जेव्हा मी तिशीत आली आहे, तेव्हा असं वाटतं की आयुष्यात खूप काही करायचं बाकी आहे. जणू हा पुनर्जन्मच आहे.”

हे सुद्धा वाचा

मुलींच्या लग्नासाठी कशा पद्धतीने सामाजिक दबाव आणला जातो, याबद्दलही ती पुढे व्यक्त झाली. “माझ्या मते तुम्ही तेव्हाच लग्न केलं पाहिजे, जेव्हा तुमची इच्छा असेल. लग्न ही खूप मोठी जबाबदारी असते. ती काही पार्टी नसते. लग्नासाठी खूप मेहनत करावी लागते. एखादं रोपटं वाढवणं, पाळीव कुत्र्याला मोठं करणं किंवा एखाद्याला बाळाचं संगोपन करणं यांइतकीच मेहनत लग्नासाठी करावी लागते. त्यामुळे ती जबाबदारी घेण्यासाठी जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल तेव्हाच लग्न करणं महत्त्वाचं असतं. पण सगळे करतायत म्हणून आपणसुद्धा करून टाकावं असा विचार मनात आणू नये”, असं तमन्ना म्हणाली.

33 वर्षीय तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील ती यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तर 36 वर्षीय विजयने 2012 मध्ये ‘चटगांव’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. गली बॉय या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजयला गोव्यातील एका पार्टीदरम्यान एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. किसिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.