Pooja Hegde: नयनतारा, समंथानंतर आता पूजा हेगडे ठरली साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

आता नयनतारा आणि समंथा यांच्यासोबत पूजासुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. नयनतारा एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये मानधन घेते. तर समंथा एका चित्रपटासाठी तीन ते सहा कोटी रुपये मानधन घेते.

Pooja Hegde: नयनतारा, समंथानंतर आता पूजा हेगडे ठरली साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
Pooja HegdeImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:49 AM

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आणि काही अभिनेते आहेत, ज्यांना बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (South Film Industry) त्यांनी खूप नाव कमावलं. अशाच कलाकारांमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेचं (Pooja Hegde) नाव येतं. पूजाने ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं. यामध्ये तिने हृतिक रोशनसोबत भूमिका साकारली होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणक्यात आपटला. यानंतर पूजाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे आपला मोर्चा वळविला. 2012 मध्ये तिने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने काही तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. तेलुगू चित्रपटसृष्टीत तिला इतकी लोकप्रियता मिळाली की अनेक सुपरस्टार्सना त्यांच्या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून आता पूजाच हवी असते. याच यशामुळे आता पूजाने तिच्या मानधनातही वाढ केली आहे. पूजा बॉलिवूडमध्ये जरी अपयशी ठरली असली तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिच्याकडे यशस्वी कलाकार म्हणून पाहिलं जातं.

पूजा सध्या विजय देवरकोंडासोबत ‘जन गण मन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आता नयनतारा आणि समंथा यांच्यासोबत पूजासुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. नयनतारा एका चित्रपटासाठी 7 कोटी रुपये मानधन घेते. तर समंथा एका चित्रपटासाठी तीन ते सहा कोटी रुपये मानधन घेते. आता अशी चर्चा आहे की पूजा तिच्या चित्रपटासाठी जवळपास पाच कोटी रुपये मानधन घेते. विजय देवरकोंडासोबतच्या या चित्रपटासाठी तिने 5 कोटी रुपये इतकी फी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

पूजाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार्स अल्लू अर्जुन, प्रभास, रामचरण यांच्यासोबत काम केलं आहे. आता ती ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजयसोबत काम करणार आहे. याशिवाय ती आणखी दोन हिंदी चित्रपटांमध्येही झळकणार आहे. जवळपास पाच वर्षांनंतर ती बॉलिवूडमध्ये परतणार आहे. ‘सर्कस’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांमध्ये ती भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.