Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan | भगव्या बिकिनीच्या वादावर अखेर शाहरुखने सोडलं मौन; म्हणाला “दीपिकासारखं कोणी..”

'पठाण'मधील 'बेशर्म रंग' या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यातील काही दृश्यांमध्ये दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. त्यावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता.

Pathaan | भगव्या बिकिनीच्या वादावर अखेर शाहरुखने सोडलं मौन; म्हणाला दीपिकासारखं कोणी..
PathaanImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 10:28 AM

मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 25 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पठाण’मधील ‘बेशर्म रंग’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यातील काही दृश्यांमध्ये दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. त्यावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. आता शाहरुखने त्यावर मौन सोडलं आहे. ‘बेशर्म रंग’ गाण्याबद्दल शाहरुखची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बेशर्म रंग गाण्यावर काय म्हणाला शाहरुख खान?

यशराज फिल्म्सने शाहरुख खानच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख पठाण या चित्रपटाविषयी आणि त्याचे सहकलाकार दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याविषयी बोलताना दिसत आहे. शाहरुखने यात म्हटलंय की फक्त दीपिकासारखीच एखादी स्टार बेशर्म रंग गाण्याला इतक्या छान पद्धतीने सादर करू शकते.

हे सुद्धा वाचा

“बेशर्म रंगसारखं गाणं चित्रित करण्यासाठी तुम्हाला दीपिकाच्या तोडीची अभिनेत्री हवी असते. फक्त गाणं सादर करणंच नव्हे तर एका दृश्यात ती एका मुलाला उचलून त्याला मारते. अशा पद्धतीचे ॲक्शन सीन्स करण्यासाठीही ती खंबीर आहे. ॲक्शन सीन्समध्ये ती माझ्याही पेक्षा जास्त टफ वाटते. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन फक्त दीपिकासारख्या अभिनेत्रीमध्येच पहायला मिळतं”, असं तो म्हणाला.

‘पठाण’ या चित्रपटामुळे 32 वर्षांपूर्वीचं स्वप्न पूर्ण झाल्याचंही शाहरुखने या व्हिडीओत सांगितलं आहे. “मी 32 वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीत एक ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र ते मी बनू शकलो नाही. कारण त्यांनी मला एक रोमँटिक हिरो बनवून टाकलं. मला फक्त ॲक्शन हिरो बनायचं होतं. मी डीडीएलजेवरही (दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे) प्रेम करतो. मला राहुल, राज आणि ती सर्व चांगली मुलं आवडतात. पण मला नेहमीच असं वाटायचं की मी एक ॲक्शन हिरो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे”, असं तो म्हणाला.

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.