हात जोडले, प्रश्न विचारले… ऐश्वर्या राय बागेश्वरबाबाच्या दरबारात?; पण ‘तो’ व्हिडीओ…
ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. अनेक पुरस्कार देखील ऐश्वर्या राय हिला मिळाले. मात्र, तिच्या पर्सनल लाईफमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.
मुंबई : ऐश्वर्या राय ही सध्या तूफान चर्चेत आहे. मात्र, यावेळी ऐश्वर्या राय ही तिच्या एखाद्या चित्रपटामुळे किंवा पुरस्कारामुळे नाही तर तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हे प्रचंड टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर अशी देखील चर्चा आहे की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर देखील सोडले. बच्चन कुटुंबियांसोबत तिचे संबंध हे चांगलेच ताणले गेले आहेत. ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांना देखील सोशल मीडियावर अनफाॅलो केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे.
घटस्फोटाच्या चर्चा या सुरू असतानाच ऐश्वर्या राय हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चक्क ऐश्वर्या राय ही बागेश्वरबाबाच्या दरबारात गेल्याचे दिसतंय. हेच नाही तर बागेश्वरबाबा यांना काही प्रश्न विचारताना ऐश्वर्या राय दिसतंय. यावर ऐश्वर्या राय हिच्या प्रश्नांना उत्तर देताना बागेश्वरबाबा दिसत आहेत.
हा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. चाहते हे या व्हिडीओवर कमेंट करताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची लेक आराध्या बच्चन ही देखील दिसत आहे. अनेकांना वाटत आहे की, खरोखरच ऐश्वर्या राय ही बागेश्वरबाबाच्या दरबारात गेलीये. मात्र, या व्हिडीओचे एक वेगळेच सत्य आहे.
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो व्हिडीओ एडिट करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ सत्य नसून तो फक्त आणि फक्त एडिट करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही बागेश्वरबाबाच्या दरबारात गेली नव्हती. मात्र, घटस्फोटाची चर्चा असतानाच हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. अनेकांना वाटले की, खरोखरच ऐश्वर्या राय ही बागेश्वरबाबाच्या दरबारात पोहचली.
ऐश्वर्या राय हिचा अशाप्रकारे व्हिडीओ एडिट करून व्हायरल होणे पहिल्यांदा घडले नाहीये. यापूर्वी ऐश्वर्या राय हिचे अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेते वातावरण हे बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय ही खरोखरच अभिषेक बच्चन याच्यासोबत घटस्फोट घेणार का हा प्रश्न विचारला जातोय.