बॉलिवूडचं ‘परफेक्ट कपल’ ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, जाणून घ्या त्यांच्या ‘हॅप्पी मॅरीड लाईफ’चं गुपित…

अभिषेक आणि ऐश्वर्या बॉलिवूडच्या परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्यांचे दोघांचे प्रेम पूर्वीसारखेच कायम आहे. दोघेही वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या एकमेकांना खंबीर साथ देतात.

बॉलिवूडचं ‘परफेक्ट कपल’ ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, जाणून घ्या त्यांच्या ‘हॅप्पी मॅरीड लाईफ’चं गुपित...
अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चन
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 10:26 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘ज्युनिअर बच्चन’ अर्थात अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या बॉलिवूडच्या परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही त्यांचे दोघांचे प्रेम पूर्वीसारखेच कायम आहे. दोघेही वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या एकमेकांना खंबीर साथ देतात (Aishwarya Rai and Abhishek Bachchan wedding anniversary special).

अभिषेक आणि ऐश्वर्या यांची जोडी प्रत्येकासाठी एक उत्तम उदाहरण आहे. इतक्या वर्षांनंतरही दोघांनी आपले नातं टिकवून ठेवले आहे. दोघांनी त्यांचे सुखी वैवाहिक जीवन कसे टिकवून ठेवले, याबद्दल सगळ्यानांच उत्सुकता आहे. चला तर, मग या दोघांच्याही सुखी वैवाहिक आयुष्याचे रहस्य जाणून घेऊया…

एकमेकांना कॉम्पलीमेंट करतात

अभिषेक आणि ऐश्वर्या नेहमीच एकमेकांच्या गुणवत्तेचे कौतुक करतात. जसे ऐश्वर्याला आवडते की, अभिषेक लहानपणापासूनच शोबिझचा एक भाग आहे आणि जबाबदारीने तो पुढे जातो. याशिवाय या गोष्टीबद्दल तो कधीही बडेजावदेखील मिरवत नाही. तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि आपले नाव कमावण्यासाठी कठोर परिश्रम करतो. ऐश्वर्याला त्याचे हेच गुण आवडतात. ऐश्वर्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, अभिषेक खूप खास आहे कारण त्याचे स्वतःचे एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. मी भाग्यवान आहे की, तो माझा नवरा आहे.

त्याचवेळी अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले की, ऐश्वर्या सर्व देखभाल व्यवस्थित करते. ती तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडते. कामाबद्दलच्या तिच्या समर्पणावर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. ती एक आई म्हणून खूप हुशार आहे. ती एक सुपर आई आहे आणि एक सह-कलाकार म्हणून मला तिच्याबरोबर काम करायला आवडते.

ऐश्वर्याला अभिषेककडून मिळते प्रेरणा

ऐश्वर्याने एकदा सांगितले होते की, ती अभिषेककडून खूप प्रेरित आहे. ती म्हणाली होती की, अभिषेक खूप सापोर्टिव्ह आहे. जेव्हा जेव्हा मी गोंधळून जाते आणि काय करावे हे समजत नाही, तेव्हा मी अभिषेककडे पाहते आणि तो माझा सर्व संभ्रम लगेच दूर करतो (Aishwarya Rai and Abhishek Bachchan wedding anniversary special).

भांडणानंतर कोण मागतं पहिली माफी?

कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्याने सांगितले होते की, भांडण झाल्यास त्या दोघांपैकी आधी कोण माफी मागतं. वास्तविक कपिलने विचारलेले की, तुमच्यात आणि अभिषेकमध्ये भांडण होते का? तर ऐश्वर्याने उत्तर दिले होते, हो बऱ्याचदा… मग कपिलने विचारले की, कोण प्रथम सॉरी बोलतं? यानंतर ऐश्वर्याने उत्तर दिले की ‘मी प्रथम सॉरी म्हणते आणि विषय संपवते.’

अफवांचा नात्यावर परिणाम नाही

एकदा या दोघांमधील नात्याबद्दल जेव्हा काही अफवा उद्भवल्या, तेव्हा अभिषेक थेट म्हणाला की, तो आपली पत्नी ऐश्वर्या हिच्यावर किती प्रेम करतो, हे फक्त आम्हालाच माहित आहे. तो म्हणाला होते की, ‘मी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला आपले संबंध बिघडवू देणार नाही.’

अशी झाली प्रेमकहाणी सुरू…

अभिषेकने इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दरम्यान सांगितले की, ‘मी सुरुवातीला ऐश्वर्याबरोबर बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले होते. आम्ही प्रथम ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटामध्ये काम केले होते. आम्ही तेव्हा चांगले मित्र होतो. मग आम्ही ‘कुछ ना कहो’मध्ये काम केले. यानंतर आम्ही खूप जवळचे मित्र झाले आणि नंतर हळू हळू दोघांची मैत्री प्रेमात बदलली.’

‘उमराव जान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनाही प्रेम झाल्याचे अभिषेकने पुढे सांगितले होते. यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि त्यानंतर दोघांनी 2007 साली लग्न केले. दोघांनाही मुलगी आराध्या असून, तिघेही परिपूर्ण कुटुंबाप्रमाणे जीवन जगतात.

(Aishwarya Rai and Abhishek Bachchan wedding anniversary special)

हेही वाचा :

Indian Idol 12 Update | सवाई भटसोबतच नेहा कक्करही ‘इंडियन आयडॉल’मध्ये गैरहजर! जाणून घ्या कारण…

PHOTO | ‘अनन्या’ फेम ऋतुजा बागवेच्या ‘बोल्ड’ फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.