‘थोडं तरी वयाचं भान…’, दुसऱ्या बाळाबद्दल विचारताच अभिषेक बच्चनचं लक्षवेधी उत्तर
Abhishek Bachchan On Second Child: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात दुसऱ्या बाळाबद्दल अभिषेकने केलेलं वक्तव्य देखील सध्या तुफान चर्चेत आहे...

Abhishek Bachchan On Second Child: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या नात्याबद्दल सर्वत्र अनेक चर्चे रंगल्या आहे. पण रंगणाऱ्या चर्चांचा अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यावर कोणताच फरक पडत नसल्याचं दिसून येत आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत नव्या आयुष्याची सुरुवात केली.
लग्नाच्या 4 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अभिषेक लेक आराध्या हिचं जगात स्वागत केलं. आज आराध्य बच्चन हिला देखील कोणत्या ओळखीची गरज नाही. आई – वडील आणि आजी – आजोबांप्रमाणे आराध्या देखील कायम चर्चेत असते. दरम्यान, अभिषेक बच्चन याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे.




View this post on Instagram
ज्यामध्ये अभिषेक याला दुसऱ्या बाळाबद्दल विचारण्यात आलं. यावर अभिषेकने असं उत्तर दिलं, ज्यामुळे जमलेले सर्व प्रेक्षक पोट धरुन हसू लागले. अभिनेता रितेश देशमुख याने ‘केस तो बनता है’ शोमध्ये अभिषेक याला दुसऱ्या बाळाबद्दल विचारलं. सुरुवातील रितेशने अभिषेकला विचारलं, तुमच्या कुटुंबात अनेकांची नावे ‘अ’ अक्षराने सुरु होत आहेत. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या… तर जया काही आणि श्वेताने असं काय केलं? यावर हसत अभिषेक म्हणाला, ‘याचं उत्तर त्यांनाच जाऊन विचारावं लागेल…’
दुसऱ्या बाळाबद्दल अभिषेक म्हणाला…
अभिषेक बच्चन म्हणाला, ‘आता आमच्या घरात परंपरा आहे, अभिषेक, आराध्या…’ यावर रितेश म्हणतो, ‘आराध्याच्या नंतर? म्हणजे माझा मुलगा रियान आणि राहील आहे…’ यावर अभिषेक लाजतो आणि म्हणतो, ‘वयाचं भान ठेव यार… मी तुझ्यापेक्षा मोठा आहे…’ अभिषेकचं उत्तर ऐकल्यानंतर जमलेले प्रेक्षक हासू लागतात.
रितेश आणि अभिषेक यांचे आगामी सिनेमे
रितेश आणि अभिषेक यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे. ‘हाऊसफुल 5’ सिनेमाच्या माध्यमातून दोघे चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.