Aishwarya Rai | तब्बल इतक्या वर्षांनंतर ऐश्वर्याने ‘हम दिल दे चुके सनम’बद्दल सोडलं मौन; म्हणाली..

या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या रायने जवळपास दशकभरानंतर तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. यामध्ये तिने नंदिनी आणि तिची मूक आई मंदाकिनी देवी अशा दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.

Aishwarya Rai | तब्बल इतक्या वर्षांनंतर ऐश्वर्याने 'हम दिल दे चुके सनम'बद्दल सोडलं मौन; म्हणाली..
Hum Dil De Chuke Sanam Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 8:28 AM

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लवकरच ‘पोन्नियिन सेल्वन : 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी ती सध्या जोरदार प्रमोशन करतेय. ऐश्वर्याने प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने पत्रकारांच्या विविध प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली. यातील एक प्रश्न ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाशीही निगडीत होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्याने सलमान खानसोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये ऐश्वर्याच्या भूमिकेचं नाव नंदिनी असं आहे. योगायोग म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातही तिचं नाव नंदिनी असं होतं. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटात सलमानने समीरची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. आता ‘पीएस 2’मध्ये पुन्हा एकदा नंदिनी नावाची भूमिका साकारण्यावरून ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला.

हे सुद्धा वाचा

प्रश्नाचं उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली, “काय योगायोग आहे हा? ही किती चांगली गोष्ट आहे ना? हम दिल दे चुके सनममधील नंदिनीची भूमिकासुद्धा माझ्यासाठी अविस्मरणीय होती. त्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि मी खूप आभारी आहे की मला तेव्हासुद्धा नंदिनीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.”

“नंदिनीची भूमिका ही प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठीही खूप खास ठरली होती. त्यावेळी संजय लीला भन्साळी आणि आज मणिरत्नम यांच्यासाठी मला पोन्नियिन सेल्वनमध्ये नंदिनीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. हे माझ्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी नाही. मोठ्या पडद्यावर मी अत्यंत साहसी महिलेची भूमिका साकारतेय. पीएसमधली नंदिनीचा तिच्या आजूबाजूच्या भूमिकांवर मोठा प्रभाव असतो. दिग्दर्शकांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आहे आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे”, असं ती पुढे म्हणाली.

पोन्नियिन सेल्वन 1 मध्ये चोल सम्राट राजराजा 1 अरुलमोझिवर्मन (पोन्नियिन सेल्वन- (947-1014)) यांच्या सुरुवातीच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात जयम रवी हे अरुलमोझिवर्मनच्या भूमिकेत होते. तर विक्रम, कार्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या यांनी इतर महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या रायने जवळपास दशकभरानंतर तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. यामध्ये तिने नंदिनी आणि तिची मूक आई मंदाकिनी देवी अशा दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.