तो माझ्यावर संशय घेऊन.. सलमानच्या वागण्याने त्रस्त झालेल्या ऐश्वर्याकडून अनेक गंभीर आरोप

सलमान खानशी ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्याचं नाव विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांचंही नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे.

तो माझ्यावर संशय घेऊन.. सलमानच्या वागण्याने त्रस्त झालेल्या ऐश्वर्याकडून अनेक गंभीर आरोप
Salman Khan and Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 11:14 AM

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. 1994 मध्ये तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावे केला. त्यानंतर ऐश्वर्याने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळवली. आज ती तिचा 50 वा वाढदिवस साजरा करतेय. यानिमित्ताने सोशल मीडियाद्वारे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ऐश्वर्याच्या चित्रपटांना तर प्रेक्षकांकडून पसंती मिळतेच, पण त्याचसोबत तिचं खासगी आयुष्यही तितकंच चर्चेत असतं. एकेकाळी ऐश्वर्या आणि सलमान खानचं नातं इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत होतं. या दोघांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. 2002 मध्ये अत्यंत वाईट पद्धतीने या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानवर बरेच आरोप केले होते.

90 च्या दशकात सलमान आणि ऐश्वर्या यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. संजय लीला भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षांपर्यंत हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र नंतर त्यांच्या नात्यात इतकी कटुता आली, की त्यांना एकमेकांचं तोंड बघणंही पसंत नव्हतं. रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर 2001 मध्ये सलमान ऐश्वर्याच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी रागाच्या भरात त्याने ऐश्वर्याच्या फ्लॅटच्या खिडकीची काच आणि फर्निचर तोडले होते. याविरोधात ऐश्वर्याच्या वडिलांनी 27 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती. इतकंच नव्हे तर ‘कुछ ना कहो’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने स्वत:च्या कारने टक्कर मारत ऐश्वर्याची कार मोडली होती.

हे सुद्धा वाचा

2002 मध्ये टाइम्स ऑफ इंडियासाठी एस. बालकृष्णन यांना दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने या दोन्ही घटनांची कबुली दिली होती. सलमानने ऐश्वर्यावर हातसुद्धा उचलल्याचं म्हटलं गेलं होतं. एका पुरस्कार सोहळ्यात जेव्हा ती हाताला प्लास्टर आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावून पोहोचली होती, तेव्हा त्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी ऐश्वर्याने म्हटलं होतं की पडल्यामुळे ती तिला जखम झाली होती. ब्रेकअपनंतर ई-टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं होतं, “ब्रेकअपनंतर सलमान मला सतत फोन करून त्रास द्यायचा. मी कोणत्या सहकलाकाराला डेट करतेय का, असा संशय त्याच्या मनात सतत असायचा. अभिषेक बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत माझं नाव जोडलं गेलं. अनेकदा त्याने माझ्यावर हातसुद्धा उचलला होता.”

ऐश्वर्याने असंही म्हटलं होतं की सलमानने नात्यात तिची फसवणूक केली होती आणि त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पण या ब्रेकअपचा स्वीकार न केल्यामुळे तो सतत माझा पाठलाग करायचा, असंही तिने सांगितलं होतं. सिमी गरेवालच्या मुलाखतीत ऐश्वर्याला पुन्हा एकदा सलमानसोबतच्या ब्रेकअपविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ती म्हणाली, “माझ्या मते हा विषय आता संपलेला आहे. मी याबद्दल बोलणं तर दूर पण विचारही करू इच्छित नाही. मी त्या समस्यांपासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. सलमान हा माझ्या आयुष्यात एका वाईट स्वप्नासारखा होता आणि मी देवाचे आभार मानते की हे सर्व संपलंय.”

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.