Aishwarya Rai | गणपती विसर्जनानिमित्त ऐश्वर्या राय हिच्या लेकीचा शाळेतील भन्नाट डान्स

Aishwarya Rai | बच्चन कुटुंबाच्या लेकीचा सोशल मीडियावर बोलबाला... आराध्या बच्चन हिने गणपती विसर्जनानिमित्त शाळेत केला भन्नाट डान्स... सध्या ऐश्वर्या राय आणि लेक आराध्या बच्चन यांची चर्चा रंगलेली आहे... आराध्या हिच्या डान्सवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव..

Aishwarya Rai | गणपती विसर्जनानिमित्त ऐश्वर्या राय हिच्या लेकीचा शाळेतील भन्नाट डान्स
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 10:30 AM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आता तिच्या सिनेमांमुळे चर्चेत नसली तर, कुटुंबामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते. ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे फोटो व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. तर अनेकदा आराध्या हिला आई – वडिलांसोबत विमानतळावर देखील स्पॉट केलं आहे. पण आता आराध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आराध्या हिने गणपती विसर्जानानिमित्त शाळेत भन्नाट डान्स केला. सध्या सोशल मीडियावर आराध्या हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. आराध्या हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

फोटोंमध्ये आराध्या हिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि लाल रंगाच्या ओढणीमध्ये दिसत आहे. आराध्या हिच्या मागे एक मुलगा गाणं म्हणताना दिसत आहे. तर दुसरीकडे आराध्या शाळेतील तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या हिची चर्चा रंगत आहे.

तर आणखी एका फोटोमध्ये १२ वर्षांची आराध्या शाळेतील मित्रांसोबत गणपतीसमोर फुलांची सजावट करताना दिसत आहे. फोटोंमध्ये आराध्या प्रचंड सुंदर दिसत आहे… असं चाहते म्हणत आहेत. अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र दिसतात. सोशल मीडियावर दोघींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात.

ऐश्वर्या हिने २००७ मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात झालं. दोघांच्या लग्नात फक्त कुटुंबिय आणि मित्र-परिवार उपस्थित होते.

लग्नानंतर २०११ मध्ये ऐश्वर्या हिने मुलगी आराध्या हिला जन्म दिला. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

ऐश्वर्या हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘देवदास’, ‘धुम २’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘ताल’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत ऐश्वर्या चाहत्यांच्या भेटीस आली. आता ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांमध्ये देखील ऐश्वर्या हिची चर्चा रंगलेली असते.

Non Stop LIVE Update
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'
'जनतेने निवडून दिल म्हणून लोकांना काठी हातात घेऊन माणस हाकलण्याची वेळ'.
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र...
प्रकाश आंबेडकर पुण्यातील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर मात्र....
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ
ऐन दिवाळीत राजकीय फटाके... सत्ताधारी-विरोधकांचे दावे काय?; बघा व्हिडीओ.
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण
मतदानानंतर राज्यात काय घडणार?; मनसे आमदाराच्या सूचक विधानानं उधाण.
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल
पण त्याची जाणीव नाही, वळसे पाटलांच्या आंबेगावात जाऊन पवारांचा हल्लाबोल.
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण
...म्हणून रवी राजांचा भाजपात प्रवेश, वर्षा गायकवाडांनी सांगितलं कारण.
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?
'शिंदेंनी माझा घात केला नाहीतर...', बेपत्ता असलेले वगना काय म्हणाले?.
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन
'आपला भाऊ पुन्हा...', लाडक्या बहिणींना शिवसेनेच्या बड्या नेत्याच आवाहन.
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?
शिंदेंसारखं मी पक्ष-चिन्ह ढापलं नाही, म्हणून.., राज ठाकरे काय म्हणाले?.
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, 'या' बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश.