Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळेच्या नाटकात आराध्या बच्चनचा जबरदस्त परफॉर्मन्स; नेटकऱ्यांना आठवली ‘मिस वर्ल्ड ऐश्वर्या’

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची मुलं शिकतात. नुकताच या शाळेचा वार्षिक कार्यक्रम पार पडला आणि त्यात आराध्या बच्चनने परफॉर्म केलं होतं. तिच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

शाळेच्या नाटकात आराध्या बच्चनचा जबरदस्त परफॉर्मन्स; नेटकऱ्यांना आठवली 'मिस वर्ल्ड ऐश्वर्या'
आराध्या बच्चन, ऐश्वर्या रायImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 8:24 AM

मुंबई : 16 डिसेंबर 2023 | आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्या राय आणि वडील अभिषेक बच्चन यांच्यासारखीच एक उत्तम अभिनेत्री बनू शकते, हे तिने नुकत्याच एका कार्यक्रमातून सिद्ध केलं आहे. इतर स्टारकिड्सप्रमाणेच आराध्या ही धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. नुकताच या शाळेचा वार्षिक समारंभ पार पडला. यावेळी आराध्याने खास परफॉर्मन्स दिला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आराध्याने सर्वांसमोर एक नाटक सादर केलं होतं आणि यावेळी तिचा लूक पाहून नेटकऱ्यांना सुरुवातीच्या दिवसांतील ऐश्वर्याच आठवली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच आराध्या एका वेगळ्या वेशभूषेत आणि हेअरस्टाइलमध्ये पहायला मिळाली होती.

आराध्याला लहानपणापासूनच बँग्स असलेल्या हेअरस्टाइलमध्ये पाहिलं गेलं. तिला सतत एकाच लूकमध्ये पाहून नेटकरीसुद्धा कमेंट्स करू लागले होते. अखेर आराध्याचा वेगळा लूक नेटकऱ्यांना पहायला मिळाला आणि तो सर्वांनाच आवडला. त्याचप्रमाणे स्टेजवर तिने ज्या आत्मविश्वासाने परफॉर्म केलं, ते पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. शाळेच्या या वार्षिक कार्यक्रमाला ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यासह अमिताभ बच्चन यांनीसुद्धा हजेरी लावली होती. इतकंच नव्हे तर नातीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी ऐश्वर्याची आईसुद्धा या कार्यक्रमात पोहोचली होती.

हे सुद्धा वाचा

आराध्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या या कार्यक्रमातील बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुख खान आणि गौरी यांचा मुलगा अबरामनेही स्टेजवर एक नाटक सादर केलंय. तर करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुरसुद्धा कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात आपल्या मुलाचा अत्यंत कौतुकाने व्हिडीओ काढताना करीना दिसली. याशिवाय शाहिद कपूर आणि मीरा यांची मुलं, करण जोहरची दोन्ही मुलं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व स्टारकिड्सना वेगवेगळ्या वेशभूषेत पहायला मिळालं.

आराध्याच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

आराध्याच्या परफॉर्मन्सच्या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘अखेर आराध्याचं कपाळ पहायला मिळालं, मी धन्य झालो’, असं एकाने लिहिलं. तर ‘आराध्याला या रुपात पाहून मिस वर्ल्ड झालेल्या ऐश्वर्याच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण आली’, असं दुसऱ्याने म्हटलंय. इतकंच नव्हे तर आराध्या ही अनन्या पांडेपेक्षा चांगलं अभिनय करतेय, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.