Aishwarya Rai : ‘तिने बच्चन कुटुंब सोडलं…’, ऐश्वर्या रायच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या निर्माण झालाय दुरावा? अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोमुळे पुन्हा घटस्फोटाच्या चर्चांना उधाण... फोटो तुफान व्हायरल... सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या फोटोची चर्चा...

Aishwarya Rai : 'तिने बच्चन कुटुंब सोडलं...', ऐश्वर्या रायच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 12:10 PM

अभिनेत्री ऐश्वर्या रायने नुकताच 77 व्या कान फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. हाताला दुखापत झालेली असताना देखील अभिनेत्रीने फेस्टिवलमध्ये वॉक केलं. तेव्हा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चन आईची काळजी घेताना दिसली. अशात कान फिल्म फेस्टिवरमधून परतल्यानंतर ऐश्वर्याने आईचा वाढदिवस साजरा केला. ज्याप्रकारे आराध्या कायम तिच्या आईसोबत असते. त्याचप्रकारे ऐश्वर्या देखील कायम तिच्या आईसोबत असते. ऐश्वर्याने आईचा वाढदिवस साजरा केला तेव्हा अनेक जण अभिनेत्रीसोबत होते. पण अभिषेक बच्चन नव्हता. म्हणून पुन्हा ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ऐश्वर्या हिने आईच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये आराध्या आणि तिच्या वयाचे अन्य मुलं देखील दिसत आहेत. पण अभिषेक बच्चन नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्री आईच्या वाढदिवसाचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘बर्थडे गर्लला खूप प्रेम… प्रिय आई – बाबा…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी अभिषेक कुठे आहे? असा प्रश्न विचारला. एक नेटकरी ऐश्वर्याच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘तिने बच्चन कुटुंब सोडलं… घटस्फोट’, तर अनेकांनी ‘अभिषेक कुठे आहे?’ असा प्रश्न विचारला. अशात पुन्हा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चन कुटुंबाच्या चर्चा चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगत आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘प्रतीक्षा’ बंगला मुलगी श्वेता बच्चन – नंदा हिच्या नावावर केल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या. एवढंच नाहीतर, बिग बींच्या क्रिप्टिक पोस्टमुळे देखील चाहत्यांना धक्का बसला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या – अभिषेक यांनी सोशल मीडियावर आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट करत लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या होत्या. फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटींनी देखील दोघांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला होता.

दोघांनी देखील लेक आराध्या हिच्यासोबत फोटो पोस्ट केल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला होता. तेव्हा देखील सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण ऐश्वर्याच्या आईच्या वाढदिवसाला अभिषेक आला नसल्यामुळे पुन्हा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र ऐश्वर्या हिच्या आईच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.