AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान समोर आल्यानंतर आजही संतापते ऐश्वर्या राय? एका व्हिडीओमुळे सत्य समोर

Salman Khan : सलमान खान समोर आल्यानंतर कशा असतात ऐश्वर्या राय हिच्या भावना, संतापते अभिनेत्री? एका व्हिडीओमुळे सर्वत्र चर्चांना उधाण... व्हिडीओ समोर आल्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या - सलमान यांच्या नात्याची चर्चा...

सलमान खान समोर आल्यानंतर आजही संतापते ऐश्वर्या राय? एका व्हिडीओमुळे सत्य समोर
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 8:31 AM

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांच्या ब्रेकअपला देखील अनेक वर्ष उलटली आहेत. सलमान खान त्यांच्या आयुष्यात आनंदी आहे, तर दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या आयुष्यात फार पुढे गेली आहे. तरी देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेल्या असतात. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात, पण एकमेकांना पाहिल्यानंतर देखील समोर येत नाहीत. दोघे कायम कोणत्याही कार्यक्रमात एका छताखाली असल्यास दूर राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नुकताच झालेल्या एका पार्टीतील व्हिडीओ समोर येत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझानयर मनिषा मल्होत्रा याने पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीत बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आले होते. सलमान खान आणि ऐश्वर्या राय देखील पार्टीत उपस्थित होते. पण सलमान खान येताच ऐश्वर्या पार्टीतून निघाली अशी चर्चा देखील रंगली आहे.

सलमान खान याला पार्टीचं निमंत्रण असल्यामुळे ऐश्वर्या पार्टीतून निघाली असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पार्टीतून लवकर निघालेल्या ऐश्वर्या हिला कारपर्यंत सोडण्यासाठी मनिष येतो. दोघे पापाराझींसाठी पोज देखील देतात. दरम्यान एका जवळच्या सूत्राने ऐश्वर्या पार्टीतून लवकर का निघाला.. याचा खुलासा केला आहे.

रुपोर्टनुसार, पार्टीत ऐश्वर्या राय हिच्यासोबत कुटुंबातील कोणीही नव्हतं म्हणून अभिनेत्री लवकर निघाली. ऐश्वर्या राय आणि मनिष मल्होत्रा यांच्यात फार जवळचं नातं आहे. म्हणून ऐश्वर्या पार्टीमध्ये थोड्यावेळासाठी हजर राहिली होती. एवढंच नाही तर, ऐश्वर्या एकटी आल्यामुळे बच्चन कुटुंबासोबत असलेल्या तिच्या संबंधांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची चर्चा रंगत आहे. एक काळ असा होता, जेव्हा सलमान – ऐश्वर्या चाहत्यांना कपल गोल्स देत होते. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत संसार थाटला.

ब्रेकअपनंतर ऐश्वर्या हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली. सलमान खान याने मात्र लग्न केलं नाही. सलमान खान आजही एकटा आहे. पण सलमान खान याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. सोशल मीडियावर सलमान – ऐश्वर्या यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.