Ponniyin Selvan 2 मधील ऐश्वर्या रायच्या लूकवर पती अभिषेक बच्चन फिदा; चाहत्यांकडूनही कमेंट्सचा वर्षाव
यामध्ये ऐश्वर्याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. सूड घेण्यासाठी सज्ज असणारी राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवी अशा दोन भूमिका तिने साकारल्या आहेत. पहिल्या भागातील तिच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रशंसा झाली होती.
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 1’ या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. ऐश्वर्याने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. आता याच चित्रपटाचा सीक्वेल ‘पोन्नियिन सेल्वन 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ऐश्वर्याने सोशल मीडियावर या सीक्वेलचा पोस्टर आणि टीझर शेअर केला आहे. यामधील नंदिनीच्या भूमिकेतील ऐश्वर्याच्या लूकवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय. चाहत्यांसोबतच पती अभिषेक बच्चनलाही या लूकवर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही. अभिषेकनेही ऐश्वर्याच्या या पोस्टरवर कमेंट केली आहे.
ऐश्वर्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा पहायला मिळतेय. यासोबतच एक पोस्टरसुद्धा शेअर केला आहे. ‘त्यांच्या डोळ्यांमध्ये आग.. त्यांच्या हृदयात प्रेम.. त्यांच्या तलवारींवर रक्त.. सिंहासनासाठी लढण्यासाठी चोल पुन्हा येणार’, असं कॅप्शन तिने या पोस्टरला दिलं आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या या लूकचं कौतुक होत आहे. ऐश्वर्याच्या या लूकवर अभिषेकने फायर इमोजी पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या या चित्रपटाच्या पहिल्या भागात चोल साम्राज्याची कहाणी दाखवण्यात आली होती. या चित्रपटाची कथा जिथे संपली, तिथूनच आता सीक्वेलची कथा सुरू होणार आहे. यावेळी चित्रपटाच चियान विक्रमचा नवा लूक पहायला मिळेल. आज म्हणजेच 29 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पीएस- 2 चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ऐश्वर्यासोबतच चियान विक्रम, कार्थी, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन यांच्याही भूमिका आहेत.
काय आहे पोन्नियिन सेल्वनचा अर्थ?
मणिरत्नम यांचा हा चित्रपट दोन भागांचा आहे. पोन्नियिन सेल्वनमधील पोन्नी म्हणजे कावेरी नदीचा पुत्र. या चित्रपटाची कथा कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये चोल साम्राज्य आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये होत असलेली लढाई दाखवण्यात आली आहे. दहाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर ही कथा आधारलेली आहे.
View this post on Instagram
एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’सारखाच भव्यदिव्य असा हा चित्रपट होता. दुसरा भागही तितकाच मोठा असेल. कलाकारांची वेशभूषा, दागदागिने, चित्रपटाचा सेट, व्हीएफएक्स हे सर्व अत्यंत दमदार आणि आकर्षक पद्धतीचं आहे. यामध्ये ऐश्वर्याने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. सूड घेण्यासाठी सज्ज असणारी राणी नंदिनी आणि मंदाकिनी देवी अशा दोन भूमिका तिने साकारल्या आहेत. पहिल्या भागातील तिच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रशंसा झाली होती.