Aishwarya Rai ला कोणासोबत करायचं होतं लग्न? मुलाखतीत केला होता मोठा खुलासा

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सर्वत्र चर्चा, अभिनेत्रीला कशा मुलासोबत करायचं होतं लग्न? जोडीदाराबद्दल ऐश्वर्या राय हिने केलं होतं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या यांच्या नात्याची चर्चा...

Aishwarya Rai ला कोणासोबत करायचं होतं लग्न? मुलाखतीत केला होता मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 10:56 AM

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन फक्त तिचे सिनेमे, सौंदर्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. ऐश्वर्या राय हिने तिच्या सौंदर्याने जगभरातील चाहत्यांना घायाळ केलं आहे. ऐश्वर्या सध्या बॉलिवूडपासून दूर आहे, तरी देखील अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. ऐश्वर्या हिच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी असल्याच्या चर्चा चाहते आणि सोशल मीडियावर सुरु आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत ऐश्वर्या हिने तिच्या जोडीदाराबद्दल मोठा खुलासा केला होता. ज्यामुळे ऐश्वर्या पुन्हा चर्चेत आली आहे.

दिग्दर्शक करण जोहर याच्या कॉफी विथ करण शोमध्ये ऐश्वर्या हिने जोडीदाराबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. ‘तुला कशा व्यक्तीसोबत लग्न करायला आवडेल?’ असा प्रश्न करण जोहर याने ऐश्वर्या हिला विचारला होता. यावर ऐश्वर्या म्हणाली होती, ‘असं काही झालं तर तुम्हाला नक्की माहिती पडेल. मला जो अनुभव आला आहे, त्यामुळे मला नाही वाटत मी लग्नाचा विचार करु शकते. आयुष्य ज्या दिशेने नेईल त्या दिशेने मी जाईल…’ असं कॉफी विथ करण शोमध्ये ऐश्वर्या म्हणाली होती.

पुढे करण याने ऐश्वर्या हिला अभिनय क्षेत्रात तुझं प्रेरणा स्थान कोण आहे? असा प्रश्न विचारला होता. यावर ऐश्वर्या म्हणाली होती, ‘अनेक कलाकार आहेत. पण अमित जी (अमिताभ बच्चन) अविश्वसनीय आहे…’, सध्या सर्वत्र ऐश्वर्या हिच्या जुन्या मुलाखतीची चर्चा रंगली आहे. एवंढच नाही तर, अनेक मुलाखतींमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील सून ऐश्वर्या राय बच्चन हिचं कौतुक केलं आहे.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं

अभिनेता सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिच्या आयुष्यात अभिषेक बच्चन याची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 2007 मध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या आणि ऐश्वर्या यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येतं. नुकताच संपूर्ण बच्चन कुटुंब ‘द अर्चिज’ सिनेमाच्या स्क्रिनींगसाठी एकत्र आलं होतं. स्क्रिनींग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.