नेमकी भानगड काय? ऐश्वर्या-अभिषेक अंबानींच्या लग्नाला वेगवेगळे आले पण नंतर..

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबीयांसोबत मिळून आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान दोघांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नेमकी भानगड काय? ऐश्वर्या-अभिषेक अंबानींच्या लग्नाला वेगवेगळे आले पण नंतर..
अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या-अभिषेक आले वेगवेगळेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 2:27 PM

सध्या सोशल मीडियावरील फेसबुक किंवा इन्स्टाग्रामचं अकाऊंट उघडलं की थेट अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात पोहोचल्यासारखं वाटतं. गेल्या काही दिवसांपासून हा भव्यदिव्य लग्नसोहळा अनेकांच्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. ‘वेडिंग ऑफ द इयर’ म्हणून संबोधल्या गेलेल्या या लग्नसोहळ्याला देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अंबानींचा असेल आणि त्याला बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार नाहीत, असं होणारच नाही. बच्चन कुटुंबीय, शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित यांसह अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला आपल्या ग्लॅमरस अंदाजात पोहोचले होते. कोणत्या सेलिब्रिटीचा लूक कसा होता, हे पाहण्यासाठी नेटकरीसुद्धा उत्सुक होते. मात्र या सगळ्यात ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांची वेगवेगळी एण्ट्री.. हा नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा मुद्दा ठरला. पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना संपूर्ण बच्चन कुटुंबीय एकत्र होते. मात्र त्यात फक्त ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या दिसली नाही. या दोघी नंतर कार्यक्रमाला पोहोचल्या आणि फक्त दोघींनीच पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले.

वेगवेगळ्या एण्ट्रीमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. किमान अभिषेकने तरी त्या दोघींसोबत यायला हवं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले. बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यात नक्कीच काही आलबेल नाही, अशाही चर्चा होत्या. या सर्व चर्चांदरम्यान आता ऐश्वर्या आणि अभिषेकचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जिओ वर्ल्ड सेंटरमधील लग्न समारंभाच्या वेळचा आहे.

हे सुद्धा वाचा

Abhishek and aishwarya together!!!!!! byu/Lamplightqueen inBollyBlindsNGossip

या व्हिडीओमध्ये सर्व पाहुणे खुर्च्यांवर बसलेले दिसत आहेत. सुरुवातील अभिनेता सलमान खान रांगेत सर्वांत पुढे उभा असल्याचं पहायला मिळतंय. नंतर इतर पाहुण्यांकडे कॅमेरा फिरतो, तेव्हा मागे ऐश्वर्या आणि अभिषेक बाजूबाजूला बसलेले दिसतात. यावेळी ऐश्वर्या ही तिच्या डाव्या बाजूला बसलेल्या आराध्याशी काहीतरी बोलत असते आणि तिच्या उजव्या बाजू अभिषेक बसला आहे. या दोघांमध्ये मात्र काही संवाद झाला नाही. त्यामुळे कार्यक्रमात जरी वेगवेगळे पोहोचले असले तरी अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नसोहळ्यात एकत्र बसले होते.

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....