Aishwarya Rai हिच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी; अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य

'ऐश्वर्या घराची पूर्ण जबाबदारी पार पाडते आणि मी तिच्यावर प्रेम करतो..', अभिषेक बच्चन याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा... सध्या सर्वत्र ऐश्वर्या - अभिषेक यांच्या नात्याची चर्चा...

Aishwarya Rai हिच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी; अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 1:30 PM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन (abhishek bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची लव्हस्टोरी आज प्रत्येकाला माहिती आहे. अभिषेक – ऐश्वर्या कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक कपल म्हणजे अभिषेक – ऐश्वर्या…, दोघे कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. एवढंच नाही तर, संधी मिळताच दोघे एकमेकांचं कौतुक देखील करतात. नुकताच अभिषेत बच्चन याने पत्नी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे दोघांची जोडी पुन्हा चर्चेत आली आहे. ऐश्वर्या यशस्वी असून देखील घरात अगदी साधी असते… असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन याने पत्नी ऐश्वर्या राय हिचं कौतुक केलं. ‘कधी – कधी तुम्ही कामात इतके व्यस्त होता की तुमच्या सोबत वेळ व्यतीत करण्यासाठी वेळच नसतो. अशात ऐश्वर्या हिच्या खांद्यावर घराची संपूर्ण जबाबदारी असते. मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तिचे आभार मानतो. ती सर्व काम निस्वार्थपणाने करते.’ असं ऐश्वर्याबद्दल अभिनेता म्हणाला.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘कधी कामाचा तणाव असतो, म्हणून घरी परतल्यानंतर थकवा जाणवतो. तेव्हा देखील ऐश्वर्या कोणतीही तक्रार करत नाही. पण एक अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या मला समजून घेते. आमचं एक सामान्य कुटुंब आहे. आम्हाला एकत्र वेळ घालवणं आवडतं आणि शक्य तितकं सामान्य राहण्यचा आम्ही प्रयत्न करतो…’ असं देखील अभिनेता म्हणाली.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम कामगिरी केली. तर अभिषेक स्टारर ‘घूमर’ सिनेमा १८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहते देखील अभिषेक याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न मुंबईमध्ये ठरावीक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालं. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या.

लग्नानंतर १६ नोव्हेंबर २०११ मध्ये ऐश्वर्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे. स्टारकिड्स म्हणून आराध्या देखील प्रचंड लोकप्रिय आहे. आराध्या हिचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.