AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan यांच्या अपघातानंतर अजय देवगण म्हणाला, ‘बिग बींनी तिसऱ्या मजल्यावरुन…’

'बिग बींनी तिसऱ्या मजल्यावरुन...', अमिताभ बच्चम यांच्या अपघातानंतर चाहते चिंता व्यक्त करत असताना अभिनेता अजय देवगण याने सांगितलेली घटना थक्क करणारी...

Amitabh Bachchan यांच्या अपघातानंतर अजय देवगण म्हणाला, 'बिग बींनी तिसऱ्या मजल्यावरुन...'
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 10:44 AM

Ajay Devgn On Amitabh Injury : महानायक अमिताभ बच्चन यांचा हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना अपघात झाला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत असताना अभिनेता अजय देवगण याने अनेक वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला आहे. आताच्या घडीला ॲक्शन सीन शुट करणं सहज सोपं आहे, पण २५ वर्षांपूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. असं अजय देवगण म्हणाला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याने केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे.

१९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘मेजर साब’ सिनेमाच्या सेटवर घडलेली एक घटना सांगत अजय म्हणाला, ‘फार वर्षांपूर्वी आमचं काम कठीण होतं, पण आता अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. महानायक अशा काळात ॲक्शन सीन शुट करत होते जेव्हा सुरक्षेच्या काहीही सुविधा नव्हत्या. तेव्हा ॲक्शन सीन शुट करताना अपघाता व्हायचे.’

‘अमिताभ बच्चन यांनी असे ॲक्शन सीन दिले आहेत, याचा आपण विचार देखील करू शकत नाही. एकदा ॲक्शन सीन साठी बिग बींनी तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की असं करु नका. हा सीन आपण डिप्लिकेट व्यक्तीकडून करुन घेवू. आम्हाला दोघांना एकत्र उडी मारायची होती. तेव्हा त्यांनी उत्साहात म्हटलं होतं आपण करु…’ असं अभिनेता अजय देवगण म्हणाला होता. तेव्हा देखील सीन शूट करताना अमिताभ बच्चन आणि अजय देवगण दोघे जखमी झाले होते.

अमिताभ बच्चन हैदराबाद याठिकाणी ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना गंभीर जखमी झाले आहेत. सध्या बिग बी मुंबई याठिकाणी असेलल्या जलसामध्ये आराम करत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ सिनेमात अभिनेता प्रभास, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

वयाच्या ८० व्या वर्षी ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला आहे.बिग बींच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अपघातानंतर बिग बी यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होत असल्यामुळे शुटिंग रद्द करण्यात आली आहे.

अजय याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘भोला’ सिनेमात्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा ३० मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री तब्बू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.