अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी गरोदर; बेबी बंपसह व्हिडीओ होतोय व्हायरल

नुकतंच या अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळत आहे.

अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी गरोदर; बेबी बंपसह व्हिडीओ होतोय व्हायरल
Ajay devgan
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 2:04 PM

मुंबई : अभिनेता अजय देवगणचा सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’मध्ये त्याच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ताने गुडन्यूज दिली आहे. इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. ती लवकरच आई होणार आहे. इशिताने स्वत: ही गोड बातमी चाहत्यांनी दिली नाही किंवा प्रेग्नंसीबाबत तिने कोणती पोस्ट शेअर केली नाही. मात्र तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळतोय. इशिताला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून चाहते इशितावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

2023 हे वर्ष इशिता आणि तिचा पती वत्सलसाठी खूपच खास ठरत आहे. कारण याच वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी नवीन घर खरेदी केलं. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हे दोघं नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. तर दुसरीकडे लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशिता आई होणार आहे. इशिताने अभिनेता वत्सलशी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केलं होतं. इस्कॉन मंदिरात या दोघांनी लग्न केलं. ‘रिश्तों का सौदागर- बाजीगर’च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. याच सेटवर एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

हे सुद्धा वाचा

2021 मध्ये इशिता गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावेळी इशिताने पुढे येऊन या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. गेल्या वर्षी तिने ‘दृश्यम 2’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. अजय देवगण आणि इशिताशिवाय या चित्रपटात श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू यांच्याही भूमिका होत्या.

इशिताचा पती वत्सल शेठ याने अजय देवगणच्याच ‘टार्झन- द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर तो ‘एक हसीना थी’ आणि ‘हासील’ यांमध्येही झळकला.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.