Bholaa | प्रदर्शनाआधीच अजय देवगणच्या ‘भोला’ची धमाल; ॲडव्हान्स बुकिंगद्वारे केली इतकी कमाई

कैथी या तमिळ चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वांत आधी त्याच्या मुलीला भेटायचं ठरवतो. मात्र पोलीस आणि ड्रग माफिया यांच्यात तो अडकतो. भोला या चित्रपटात आमला पॉल या अभिनेत्रीचीही भूमिका आहे.

Bholaa | प्रदर्शनाआधीच अजय देवगणच्या 'भोला'ची धमाल; ॲडव्हान्स बुकिंगद्वारे केली इतकी कमाई
BholaaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 10:27 AM

मुंबई : शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटांनंतर आता अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘दृश्यम 2’च्या यशानंतर अजय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘भोला’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल करेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अजय देवगणच्या भोलाची ॲडव्हास बुकिंगचे आकडे मात्र सकारात्मक आहेत.

रविवारपासून ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. खुद्द अजयने तब्बूसोबत व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर दोन-तीन तासांतच आयमॅक्स आणि 4 डीएक्स व्हर्जनसह संपूर्ण देशात जवळपास 1200 तिकिटं विकली गेली. या तिकिटांमधून जवळपास 7 लाख रुपयांहून अधिक कमाई झाली. ‘भोला’ हा चित्रपट येत्या 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या नऊ दिवसांत ॲडव्हान्स बुकिंगद्वारे दमदार कमाई होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द अजयनेच केलं असून त्यानेच मुख्य भूमिका साकारली आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कैथी’ या तमिळ सुपरहिट चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अजयसोबत तब्बूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

काय आहे कैथी चित्रपटाची कथा?

कैथी या तमिळ चित्रपटाची कथा एका गुन्हेगाराभोवती फिरते. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वांत आधी त्याच्या मुलीला भेटायचं ठरवतो. मात्र पोलीस आणि ड्रग माफिया यांच्यात तो अडकतो.

भोला या चित्रपटात आमला पॉल या अभिनेत्रीचीही भूमिका आहे. आमला पॉल ही पहिल्यांदाच बाॅलिवूडमध्ये काम करतेय. आमला  ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आमलाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. दिग्दर्शक म्हणून अजयचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी त्याने यू मी और हम, शिवाय आणि रनवे 34 या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.