AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar: जय भवानी, जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पहा अक्षय कुमारचा फर्स्ट लूक

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत; छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार, 'वेडात मराठे..'चा हा Video पहाच!

Akshay Kumar: जय भवानी, जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पहा अक्षय कुमारचा फर्स्ट लूक
'वेडात मराठे वीर दौडले सात'मधील अक्षय कुमारचा फर्स्ट लूकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 1:20 PM

मुंबई: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. इन्स्टाग्रामवर अक्षयने एक व्हिडीओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर तो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अक्षयच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आजपासूनच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. आता अक्षयने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

अंगात थोडा कणखरपणा आणि चेहऱ्यावर थोडं हसू असावं, बाकी एक नंबर, अशी कमेंट एका युजरने केली. तर मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट येतोय, असं दुसऱ्याने लिहिलंय. मी अक्षयचा खूप मोठा चाहता आहे पण मला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य नाही वाटत, असंही एका युजरने म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकरच उत्तम, अशीही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.