अक्षय कुमारच्या मुलाने सोडलं घर, घालतो असे कपडे; म्हणाला, ‘त्याला थांबवण्याचा प्रयत्न केले पण… ‘
Akshay Kumar : बाप गडगंज श्रीमंत असून जगतोय असं आयुष्य... अक्षय कुमारच्या लेकाने सोडलं आलिशान घर, आता जगतोय एकटाच, अभिनेता म्हणाला, 'मी त्याला थांबवण्याचा प्रचंड प्रयत्न केला पण...', अनेक वर्षांनंतर खिलाडी कुमार याने सोडलं मैन...
अभिनेता अक्षय कुमार कायम त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. अभिनेता त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि मुलांबद्दल फार काही बोलत नाही. पण आता अभिनेत्याने मुलगा आरन याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त अक्षय आणि त्याच्या मुलाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याचा मुलगा त्याच्यासोबत राहात नाही. वयाच्या 15 व्या वर्षी अक्षयच्या लेकाने वडिलांचं घर सोडलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मुलाच्या अनेक सवयी सांगितल्या आहे. जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल.
नुकताच झालेल्या एका टॉक शोमध्ये अक्षय कुमार याने अनेक वर्षांनंतर मुलगा आरव याच्याबद्दल सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘माझा मुलगा आरव लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. त्याला वाचायला प्रचंड आवडतं. त्याला एकटं राहायला आवडतं.’
‘घर सोडून लंडन येथे जाण्याचा निर्णय देखील त्याचा स्वतःचा होता. मी त्याला थांबवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण त्याला थांबवू शकलो नाही, कारण मी स्वतः वयाच्या 14 व्या वर्षी घर सोडलं होतं. आरव लंडन याठिकाणी एकटा राहातो. आरव स्वतःचे कपडे स्वतःता धुवतो. त्याला स्वयंपाक देखील उत्तम बनवता येतो…’
‘आरव याला भांडी देखील घासता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरव कधीच महागडे कपडे घालत नाही. तो कायम स्वस्त आणि सेकेंड हँड कपडे खरेदी करतो. आम्ही देखील कधी त्याच्यावर कोणती गोष्ट करण्यासाठी दबाव टाकला नाही. त्याला फॅशन करायला आवडे, पण त्याला सिनेमांमध्ये रस नाही.’
पुढे अक्षय कुमार म्हणाला, ‘एकदा आरव माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला सिनेमांमध्ये काम करायचं नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो, तुझं आयुष्य आहे तुला जे करायचं आहे ते कर…’, आरव इतर स्टारकिड्स प्रमाणे कधीच लाईमलाईटमध्ये नसतो. कधीतरी आरव याला कुटुंबासोबत स्पॉट करण्यात येत.
यावेळ अक्षय याने लेक नितारा हिच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ट्विंकल आणि मी ज्याप्रमाणे आरव याचं पालन-पोषण केलं आहे. त्यावर आम्हाला आनंद आहे. आरव प्रचंड साधा मुलगा आहे. पण माझ्या मुलीला कपडे प्रचंड आवडतात..’ सांगायचं झालं तर, अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील लेकीसोबत कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.