AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

55 वर्षीय अक्षर कुमारला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं भारी; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

या टूरमध्ये अक्षयसोबत नोरा फतेही, सोनम बाजवा, मौनी रॉय, दिशा पटानी आहेत. गेल्या महिन्यात या वर्ल्ड टूरची सुरुवात झाली होती. या टूरमधील अक्षय आणि नोराच्या डान्सचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

55 वर्षीय अक्षर कुमारला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं भारी; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 12:29 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ‘द एंटरटेनर्स टूर’मुळे चर्चेत आहे. या टूरअंतर्गत तो बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींसोबत परदेशात विविध ठिकाणी स्टेज शोज करत आहे. या शोजचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओमुळे अक्षय कुमारला ट्रोलही केलं जातंय. याचदरम्यान त्याचा एक व्हिडीओ ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. यामध्ये अक्षय स्टेजवर अभिनेत्री मौनी रॉय आणि सोनम बाजवा यांच्यासोबत डान्स करताना दिसतोय. मात्र यावेळी त्याचा शर्टलेस अंदाज नेटकऱ्यांना पसंत पडला नाही. नेटकऱ्यांनी त्याला जोरदार ट्रोल केलं आहे.

अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो सोनम बाजवा आणि मौनी रॉय यांच्यासोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या डान्सच्या वेळी अक्षयने स्टेजवरच शर्ट काढला आणि तो शर्टलेस होऊन नाचू लागला. एकीकडे चाहते त्याच्या एनर्जीचं कौतुक करतायत. तर दुसरीकडे काहींनी त्याच्या या डान्सला ‘अश्लील’ म्हणत ट्रोल केलंय.

हे सुद्धा वाचा

या व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षय त्याच्या 2012 मध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडी 786’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘हा खरंच निर्लज्ज आहे, त्याला कॅनडाला पाठवा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘मर्यादा नावाची एक गोष्ट असते’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

या टूरमध्ये अक्षयसोबत नोरा फतेही, सोनम बाजवा, मौनी रॉय, दिशा पटानी आहेत. गेल्या महिन्यात या वर्ल्ड टूरची सुरुवात झाली होती. या टूरमधील अक्षय आणि नोराच्या डान्सचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षयने त्याच्या वर्ल्ड टूरला सुरुवात केली.

पहा व्हिडीओ

अक्षयच्या गेल्या दहा वर्षांच्या करिअरमधील हा सर्वांत कमी ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला होता. सेल्फी तर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र त्याआधीही अक्षयचे जवळपास पाच चित्रपट दणक्यात आपटले. गेल्या 19 महिन्यात बॉलिवूडच्या ‘खिलाडी’ने निर्मात्यांचे तब्बल 300 कोटी रुपये बुडवले आहेत.

जवळपास गेल्या 19 महिन्यात अक्षयचे सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्याचा सूर्यवंशी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मात्र बेल बॉटम, बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि राम सेतू हे चित्रपट फ्लॉप ठरले. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या एकट्या ‘पठाण’ या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. मात्र अक्षयच्या या पाच चित्रपटांची कमाई ‘पठाण’च्या निम्म्या कमाईएवढीही नाही.

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.