Akshay Kumar | “ती माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक”; अक्षय कुमारने भर मुलाखतीत मागितली माफी

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय पुन्हा एकदा त्या जाहिरातीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. आपल्या करिअरमध्ये केलेल्या चुकांवर त्याने भाष्य केलं. या मुलाखतीत अक्षयने त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडीत विविध प्रश्नांची उत्तरं खुलेपणानं दिली आहेत.

Akshay Kumar | ती माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक; अक्षय कुमारने भर मुलाखतीत मागितली माफी
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 9:05 AM

मुंबई : आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारने जेव्हा पानमसाल्याची जाहिराती केली, तेव्हा चाहत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली. या जाहिरातीमुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय पुन्हा एकदा त्या जाहिरातीविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. आपल्या करिअरमध्ये केलेल्या चुकांवर त्याने भाष्य केलं. या मुलाखतीत अक्षयने त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडीत विविध प्रश्नांची उत्तरं खुलेपणानं दिली आहेत.

“तू तुझ्या आयुष्यात कोणती चूक केली आहेस का, ज्यानंतर तू त्याचा स्वीकार केला आहेस”, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर अक्षयला त्याने केलेल्या पानमसाल्याच्या जाहिरातीची आठवण झाली. तो म्हणाला, “होय मी चूक केली आहे. मी त्याचा स्वीकारसुद्धा केला. मी इलायचीची जाहिरात केली होती. ती माझ्याकडून चूक झाली. ती चूक मी स्वीकारलीसुद्धा. त्या रात्री मला झोप लागत नव्हती आणि काहीच सुचत नव्हतं. तेव्हा मी माझ्या मनाची गोष्ट लिहिली. मला वाटतं की माणूस त्याच्या चुकांमधूनच शिकतो. मी सुद्धा शिकलो.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

पानमसाल्याच्या जाहिरातीनंतर अक्षयवर खूप टीका झाली होती. या टीकेनंतर त्याने ट्विट करत जाहीर माफी मागितली होती. “मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि शुभचिंतकांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे मी अस्वस्थ झालोय. मी तंबाखूचं समर्थन करत नाही आणि भविष्यात करणारही नाही. विमल इलायचीच्या जाहिरातीवर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा मी सन्मान करतो”, असं त्याने लिहिलं होतं.

या माफीनाम्यात अक्षयने पुढे लिहिलं होतं, “मी विनम्रतेने या जाहिरातीतून माघार घेतो. या जाहिरातीतून मिळालेलं मानधन मी चांगल्या कामासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कायदेशीर पद्धतींनुसार ब्रँडकडून ती जाहिरात ठरलेल्या वेळेपर्यंत दाखवली जाईल. पण भविष्यात जाहिराती आणि प्रोजेक्ट्सची निवड करताना मी अधिक जागरूक राहीन याचं आश्वासन देतो. या बदल्यात मला तुमच्याकडून फक्त प्रेम आणि आशीर्वाद हवा आहे.”

अक्षय कुमारने केलेल्या या जाहिरातीत त्याच्यासोबत अभिनेता शाहरुख खान आणि अजय देवगण हे कलाकारसुद्धा होते. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.