Akshay Kumar | पंतप्रधान मोदींना आंबे खाण्याविषयी प्रश्न का विचारला होता? अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयला आंबे खाण्यावरून प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याला त्याच्याच मुलाखतीची आठवण झाली. या मुलाखतीत अक्षयला विचारलं गेलं की तुला आंबे खायला आवडतात का? तू आंबे कापून खातोस की चोखून?

Akshay Kumar | पंतप्रधान मोदींना आंबे खाण्याविषयी प्रश्न का विचारला होता? अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर
Akshay Kumar and PM ModiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 8:29 AM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली, तेव्हा त्याची चर्चा देशभरात झाली. या मुलाखतीत अक्षयने काही असेही प्रश्न विचारले, ज्यावरून सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. असाच एक प्रश्न होता आंबे खाण्याचा. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयला आंबे खाण्यावरून प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याला त्याच्याच मुलाखतीची आठवण झाली. या मुलाखतीत अक्षयला विचारलं गेलं की तुला आंबे खायला आवडतात का? तू आंबे कापून खातोस की चोखून?

मुलाखतीत विचारलेल्या या प्रश्नावरून अक्षयला लगेच त्याने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीची आठवण झाली. तो म्हणाला, “तुम्ही मला हा प्रश्न मला थेट का विचारत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी हा प्रश्न विचारला होता, आता तुम्ही मला तोच प्रश्न विचारत आहात. पण तुम्ही मला हा प्रश्न थेट नाही विचारला.”

आंब्याच्या प्रश्नावर उत्तर

पुढे हसत तो म्हणतो, “तुमचा प्रश्न माझ्या हृदयापर्यंत नाही तर मेंदूपर्यंत पोहोचला आहे. असो, मी आंबे खूप आवडीने खातो. त्यावेळी आंब्यांचा ऋतू होता. माझ्या मनात काही सर्वसाधारण प्रश्न होते, तेच मी विचारले. सर्वसामान्य व्यक्तीला जे प्रश्न विचारायचे होते, ते मी माझ्या पद्धतीने त्यांना विचारले होते. मी कोणतीच भीती मनात घेऊन त्यांची मुलाखत घ्यायला गेलो नव्हतो.”

हे सुद्धा वाचा

राजकारणात जाण्याविषयी काय म्हणाला अक्षय?

भविष्यात राजकारणात जायचा विचार आहे का, असा प्रश्न अक्षय कुमारला या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “सध्या तरी असा कोणताच विचार नाही. यावर्षी मी एका वेब सीरिजचं शूटिंग करणार आहे. मी राजकारणात जाईन याचा कधी विचारच केला नाही. मात्र पुढे काय होईल ते सांगता येत नाही. पण सध्या तरी मला त्यात काही रस नाही. सध्या मला फक्त चित्रपटांत काम करायचं आहे आणि लोकांचं मनोरंजन करायचं आहे. राजकारण सध्या माझ्या मनात नाही.”

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.