Nitin Desai | नितीन देसाईंच्या निधनामुळे अक्षय कुमार शोकाकूल, ‘OMG 2’ च्या ट्रेलर लाँचबद्दल घेतला मोठा निर्णय !
विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अचानक एक्झिटमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळत आहे. त्यांच्या निधनामुळे अभिनेता अक्षय कुमारलाही मोठा धक्का बसला असून त्याने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : बुधवार, 2 ऑगस्टची सकाळ उजाडली तीच एक अनपेक्षित आणि तेवढीच नकोशी बातमी घेऊन… विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी, स्वत:च्या हातानेच उभारलेल्या एन.डी.स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी ऐकताच सर्वांनाच मोठा शॉक बसला. त्यांच्या अकाली एक्झिटने फक्त सिनेसृष्टीतील (bollywood) लोकंच नव्हे तर राजकारणी, सर्वसामान्य माणसंही हळहळली. एका गुणी कलावंताने हे असे टोकाचे पाऊल का उचलले हा एकच प्रश्न आज सर्वांच्या मनात होता. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली.
अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडच्या नामवंत अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो ‘OMG 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीन देसाई यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यावर त्यालाही मोठा धक्का बसला असून त्याने एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटर या सोशल मीडियावरील त्याच्या अकाऊंटवरून अक्षयने नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रद्रशन पुढे ढकललं आहे.
काय म्हणाला अक्षय ?
‘नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झालं. ते प्रॉडक्शन डिझाइन क्षेत्रातील दिग्गज होते आणि चित्रपटसृष्टीतीलही एक मोठा, महत्वाचा भाग होते. माझ्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं होतं. (त्यांचं जाणं) हे खूप मोठं आणि भरून न येणारं नुकसान आहे. त्यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे आम्ही ‘OMG 2′ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रद र्शित करणार नाही. उद्या सकाळी 11 वाजता हा ट्रेलर प्रदर्शित होईल,’ असे ट्विट अक्षयने केले आहे.
पोलिसांना मिळाली ऑडियो क्लिप
नितीन देसाई यांनी आयुष्य का संपवल याप्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. याचाच भाग म्हणून पोलिसांनी नितीन देसाई यांचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे. त्याऑडिओ क्लिपमध्ये चार जणांची नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दरम्यान फॉरेन्सिक टीम या ऑडियो क्लिपची पडताळणी करत आहे. नितीन देसाई यांनी काही लोकांची नावे या ऑडीओ क्लिपमध्ये रेकॉर्ड केल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण ती नावं कोणची आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. त्या क्लिपची नीट तपासणी होईल. तसेच त्याचील आलाज हा नितीन देसाई यांचाच आहे का , याची खात्रीही पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे समजते.