Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!    

नुकताच प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi bomb) चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!    
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 1:31 PM

मुंबई : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वात बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आज (9 ऑक्टोबर) सोशल मीडियावरून प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय कुमारने (Akshay Kumar) या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित केल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकची प्रशंसा झाली होती. (Akshay Kumar New Film Laxmmi Bomb Trailer released)

नुकताच प्रदर्शित झालेला ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi bomb) चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अक्षय कुमारने (Akshay kumar) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. ‘जिथे कुठे असला तिथेच थांबा, आणि लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर पाहण्यासाठी तयार व्हा. कारण आता लक्ष्मी बरसणार आहे,’ असे कॅप्शन देत त्याने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

भूतांवर विश्वास नसणार हा नायक, भारतात त्याच्या होणाऱ्या सासऱ्यांना भेटायला आला आहे. इथे लोकांची भूतांवर असणारी श्रद्धा पाहून तो त्यांना आव्हान देतो. ‘प्रत्यक्षात भूतं नसतात आणि असतील तर मला दिसतील. आणि तेव्हा मी हातात बांगड्या घालेन’, अशी घोषणा नायक करतो. यादरम्यान तो नायिकेच्या कुटुंबासोबत राहत असतो. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचवेळी त्याच्यात काही बदल घडायला लागत. अचानक तो महिलांप्रमाणे वागायला लागतो. त्यामुळे घाबरलेल घरचे अनेक उपाय करतात, असे या ट्रेलरमध्ये दिसते आहे. (Akshay Kumar New Film Laxmmi Bomb Trailer released)

कियारा अडवाणी-अक्षय कुमारची जोडी!

‘गुडन्यूज’नंतर अक्षय आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात कियारा अडवाणी नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नृत्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. पोस्टरवरून जरी हा चित्रपट गंभीर वाटत असला, तरी प्रत्यक्षात ट्रेलरमध्ये चित्रपटाची विनोदी झलक पाहायला मिळाली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्माते करत आहेत. राघव लॉरेन्स यांनी या धमाकेदार हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

(Akshay Kumar New Film Laxmmi Bomb Trailer released)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.