अखेर OMG 2 च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; अक्षय कुमारच्या भूमिकेत होणार ‘हा’ मोठा बदल

या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच यामी गौतम, अरुण गोविल आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमित राय यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

अखेर OMG 2 च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; अक्षय कुमारच्या भूमिकेत होणार 'हा' मोठा बदल
Akshay Kumar in OMG 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 12:04 PM

नवी दिल्ली | 1 ऑगस्ट 2023 : ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या बाबतीत झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून पूर्वकाळजी घेत सेन्सॉर बोर्डाने आधीच ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट सुधार समितीकडे पाठवला होता. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत दिसतोय. त्याच भूमिकेवरून प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तर दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने ही भूमिकाच बदलण्याची सूचना निर्मात्यांना दिल्याचं म्हटलं जात होतं. या सर्व चर्चांदरम्यान आता ‘OMG 2’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ‘अ’ प्रमाणपत्र मिळालं आहे. त्याचसोबत यातील कोणत्याच सीन्सवर कात्री चालवली नाही. फक्त काही सीन्समध्ये बदल करण्याचे आदेश बोर्डाने निर्मात्यांना दिले आहेत.

“UA प्रमाणपत्र देण्यासाठी समितीने बरेच कट्स सुचवले होते. मात्र निर्मात्यांना चित्रपटातील हे कट्स मान्य नव्हते. त्यामुळे ते सीन्स तसेच ठेवत ‘A’ प्रमाणपत्र स्वीकारण्याची तयारी अखेर निर्मात्यांनी दर्शवली”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. OMG 2 मध्ये करण्यात येणारे हे बदल दोन्ही दृकश्राव्य आणि दृश्य स्वरुपातील आहेत. त्यापैकी एक बदल अक्षय कुमारने साकारलेल्या पात्राविषयी आहे. अक्षयला यामध्ये स्वत: देव असल्याचं दाखवण्याऐवजी तो भगवान शंकराचा दूत आहे, असं दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत कोणताच बदल होणार नाही. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

OMG 2 या चित्रपटाच्या ट्रेलरला U/A प्रमाणपत्र मिळालं असून अद्याप तो प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच यामी गौतम, अरुण गोविल आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमित राय यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अक्षय श्रीकृष्णाच्या भूमिकेत झळकला होता.

येत्या 11 ऑगस्ट रोजीच सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सनी देओल आणि अक्षय कुमारच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. 2001 मध्ये सनी देओलचा ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. तर 2012 मध्ये अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून पसंती मिळाली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.