Akshay Kumar | ‘OMG 2’मध्ये अक्षय कुमारचा अवतार पाहून नेटकरी म्हणाले, ‘सनातन धर्माचा अपमान..’

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच यामी गौतम, गोविंद नामदेव, अरुण गोविल यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रामानंद सागर यांच्या 'रामायण' या लोकप्रिय मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल 'ओएमजी 2'मध्ये पुन्हा एकदा त्याच भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय.

Akshay Kumar | 'OMG 2'मध्ये अक्षय कुमारचा अवतार पाहून नेटकरी म्हणाले, 'सनातन धर्माचा अपमान..'
Akshay KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 3:28 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने टीझरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या 11 जुलै रोजी ‘ओएमजी 2’चा टीझर प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त अक्षयने चित्रपटातील त्याच्या लूकचा हा धमाकेदार व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो शंकराच्या अवतारात पहायला मिळत आहे. शंकराच्या अवतारातील अक्षय कुमार पुढे चालत येत असताना मागे भक्त ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत आहेत.

अक्षयचा हा टीझर प्रदर्शित होताच त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी त्याच्या या लूकविषयी आणि चित्रपटाच्या कथेविषयी कुतूहल व्यक्त केलं आहे. तर काहींनी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत अशी अपेक्षा केली आहे. ‘या चित्रपटात सनातन धर्माची मस्करी होऊ नये’, असं एकाने लिहिलं. तर ‘अपेक्षा हीच आहे की सनातन धर्माचा आदर केला जावा’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

‘ओएमजी 2’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांची टक्कर पहायला मिळणार आहे. 2012 मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचाच हा सीक्वेल आहे. पहिल्या भागात अभिनेते परेश रावल आणि अक्षय कुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या सीक्वेलची कथा आणि त्यातील कलाकारसुद्धा नवीन आहेत. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच यामी गौतम, गोविंद नामदेव, अरुण गोविल यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविल ‘ओएमजी 2’मध्ये पुन्हा एकदा त्याच भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.