अक्षय कुमार श्रेयस तळपदेच्या भेटीला; हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेता रुग्णालयात दाखल

गुरुवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता श्रेयस तळपदेला अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर रात्री उशिरा अँजियोप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेता अक्षय कुमार श्रेयसची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचला आहे.

अक्षय कुमार श्रेयस तळपदेच्या भेटीला; हृदयविकाराच्या झटक्यानंतर अभिनेता रुग्णालयात दाखल
Akshay Kumar and Shreyas TalpadeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 9:56 AM

मुंबई : 15 डिसेंबर 2023 | अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. आता अभिनेता अक्षय कुमार श्रेयसची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचला आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटाचं शूटिंग संपवून घरी परतलेल्या श्रेयसला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. या चित्रपटासाठी श्रेयससोबतच अक्षय कुमारसुद्धा शूटिंग करत होता. श्रेयसवर अँजियोप्लास्टी झाल्यानंतर आता अक्षयने रुग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली आहे. सध्या श्रेयसची प्रकृती ठीक असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ या फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शक अहमद खान करतोय. या चित्रपटात श्रेयससोबतच अक्षय कुमार, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, झाकीर हुसैन आणि यशपाल शर्मा यांच्या भूमिका आहेत.

“श्रेयसला संध्याकाळी उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर रात्री 10 वाजताच्या सुमारास अँजियोप्लास्टी करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल”, अशी माहिती डॉक्टरांनी ‘इंडिया टुडे’ला दिली. श्रेयसच्या सेक्रेटरीनेही त्याच्या आरोग्याविषयीची माहिती दिली आहे. श्रेयस ठीक असून त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याची माहिती सेक्रेटरीने दिली. श्रेयसला एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार असल्याचंही कळतंय. चित्रपटाचं शूटिंग संपवून घरी परतल्यानंतर काही वेळातच श्रेयसला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता ठीक आहे.

हे सुद्धा वाचा

श्रेयसच्या प्रकृतीबद्दल कळताच सोशल मीडियावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. अनेकजण तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. 47 वर्षीय श्रेयस हा मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इकबाल’ या चित्रपटामुळे त्याला बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळाली. त्याने ओम शांती ओम, गोलमाल रिटर्न्स, डोर आणि हाऊसफुल 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.