‘या’ मुलाने घरासाठी केले हॉटेलमध्ये काम, विकले दागिने; आज शहरुख – सलमानपेक्षा जास्त चाहते, फी

'हा' मुलगा आज बॉलिवूड इंडस्ट्रीवर करतो राज्य; सोशल मीडियावर त्याची तगडी फॉन फॉलोइंग.... शाहरुख - सलमान यांच्यापेक्षा अधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही ओळखलं...

'या' मुलाने घरासाठी केले हॉटेलमध्ये काम, विकले दागिने; आज शहरुख - सलमानपेक्षा जास्त चाहते, फी
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 10:04 AM

मुंबई : घरासाठी प्रत्येक जण झटत असतो. आपल्या कुटुंबियांची भूक भागवण्यासाठी व्यक्ती कोणतंही काम करण्यासाठी तयारी दाखवतो. अशाच एका चिमुकल्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे फोटोमध्ये दिसणारा चिमुकला आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. सोशल मीडियावर देखील त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, या चिमुकल्याने परिस्थितीवर मात करत अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांना देखील शर्यतीत मागे टाकलं आहे. आजपर्यंत या फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकल्याने अभिनेता म्हणून अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. आता लहानपणीचा फोटो व्हायरल झाल्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे.

अभिनयाच्या प्रवासात अभिनेत्याचे अनेक सिनिमे अपयशी ठरले, पण त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. नुकताच प्रदर्शित झालेल्या अभिनेत्यांच्या सिनेमांना यश मिळालं नाही. फोटोमध्ये दिसणारा चिमुकला आज इंडस्ट्रीमधील फार मोठा अभिनेता आहे. चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अक्षय कुमार आहे. व्हायरल होत असलेला फोटो अक्षय कुमार याच्या लहानपणीचा आहे.

Akshay Kumar

 

अक्षय कुमार हा इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. खिलाडी कुमार याची फी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपेक्षा अधिक आहे. पण अभिनेता आज ज्या स्थानावर आहे, त्यासाठी अक्षयने प्रचंड मेहनत आणि संघर्ष केला आहे. पण आलेल्या परिस्थितीला सामोरं जात अभिनेत्याने त्याला जे हवं ते मिळवलं आहे.

akshay kumar

करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत अभिनेत्याने हॉटेलमध्ये काम केलं. एवढंच नाही तर, अभिनेत्यावर एक वेळ अशी अली जेव्हा अक्षयने दागिने विकण्याचं देखील काम केलं. अखेर अभिनेत्याने मॉडलिंग क्षेत्रार पदार्पण केलं. अभिनेत्याला सिनेमांमध्ये काम करण्यासाठी संधी मिळाली. पण आता प्रत्येक लहान मुलगा आणि वृद्ध व्यक्ती देखील अक्षय कुमार याला ओळखतो.

सोशल मीडियावर देखील अक्षयच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिनेत्याच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

अक्षयच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सेल्फी’ सिनेमाला अपयशाचा सामना करावा लागला. सिनेमात अक्षयसोबत अभिनेता इमरान हाशमी, अभिनेत्री डायना पेंटी आणि नुसरत भरूचा यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली. सध्या चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.