AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt | कतरिना कैफबद्दल आलियाचं वागणं पाहून भडकले नेटकरी; म्हणाले ‘बॉयफ्रेंड चोर’

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे जवळपास पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणास्तव या दोघांचं ब्रेकअप झालं. रणबीरने गेल्या वर्षी आलिया भट्टशी लग्न केलं. तर कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली.

Alia Bhatt | कतरिना कैफबद्दल आलियाचं वागणं पाहून भडकले नेटकरी; म्हणाले 'बॉयफ्रेंड चोर'
Alia Bhatt and Katrina KaifImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 10:12 AM

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यात एकेकाळी खूप चांगली मैत्री होती. या दोघी एकत्र जिमला जायच्या आणि बऱ्याचदा त्यांना सोबत पाहिलं गेलं. मात्र आता या दोघांची मैत्री पहिल्यासारखी राहिलेली नाही. माध्यमांसमोर आलिया आणि कतरिना अजूनही एकमेकींच्या खास असल्यासारखं वागतात. प्रत्यक्षात या दोघींच्या मैत्रीत कटुता आली आहे. आलिया आणि कतरिनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघींनी नेहा धुपियाच्या ‘बीएफएफ’ या चॅट शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. यावेळी दोघींनी एकसारखेच कपडे परिधान केले होते. मात्र आलियाच्या वागणुकीवर नेटकरी नाराज झाले आहेत.

या चॅट शोमध्ये नेहा आलियाला विचारते, “तुला जर कतरिनाची एखादी भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तर तू कोणती भूमिका निवडशील?” या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच आलिया तिची जीभ बाहेर काढून विचित्र तोंड करते. उत्तर देण्याची वेळ संपते, मात्र ती काही नेहाला उत्तर देत नाही. त्यादरम्यान कतरिना म्हणते की ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये तिने एका बबली मुलीची भूमिका साकारली होती. मात्र तरीसुद्धा आलिया एकही नाव घेत नाही. त्यानंतर शिक्षा म्हणून तिला मिर्ची खावी लागते. आलियाचं हे वागणं नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आलियाने तिच्या बॉयफ्रेंडला चोरलं, तुम्ही भूमिकेबद्दल बोलताय’, असं एकाने लिहिलं. तर ‘आरकेच्या प्रेयसीची कतरिनाची भूमिका आलियाने चोरली’, असं दुसऱ्या युजरने म्हलंय. ‘ती राजनिती किंवा अजब गजब प्रेम कहानी अशा चित्रपटांची नावं घेऊ शकत होती. इतकंच नव्हे तर ‘नमस्ते लंडन’ किंवा ‘सिंग इज किंग’ म्हटलं असतं तरी चाललं असतं. ती स्वत:ला कतरिनाची चांगली मैत्रीण म्हणते, मग एखादं तरी नाव ती घेऊच शकली असती’, अशा शब्दांत नेटकऱ्याने टीका केली.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

Throwback: When Alia couldn’t name a single role of Katrina’s she would want to steal. I mean she could have said something considering that they call themselves BFFs. by u/Master_BenKenobi in BollyBlindsNGossip

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे जवळपास पाच वर्षांपेक्षा अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणास्तव या दोघांचं ब्रेकअप झालं. रणबीरने गेल्या वर्षी आलिया भट्टशी लग्न केलं. तर कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी रणबीरची आई नीतू कपूर यांची एक पोस्ट चर्चेत होती. या पोस्टमधून त्यांनी कतरिनाला टोमणा मारल्याचं म्हटलं जात होतं. ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.