लेकीबद्दल बोलताना आलिया भट्ट भावूक; म्हणाली, ‘घरात भांडणं सुरू असताना राहा…’
Alia Bhatt on daughter Raha Kapoor: 'घरात भांडणं सुरू असताना राहा...', आलिया भट्टच्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारा क्षण... सांगताना भावून झाली अभिनेत्री, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या वक्तव्याची चर्चा...
अभिनेत्री आलिया भट्ट हिने फार कमी वेळात प्रसिद्ध आणि यश्स्वी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण गेल्या काही दिवसांपासून आलिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 14 एप्रिल 2022 मध्ये आलिया हिने बॉयफ्रेंड रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्रीने 6 नोव्हेंबर 2022 रोजी लेक राहा हिला जन्म दिला.
लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्ट हिला अनेकदा राहा हिच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आलिया हिने राहा हिच्याबद्दल भावना व्यक्त करत भावूक झाली. 2022 मध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’ सिनेमाची शुटिंग सुरु असताना आलिया हिला राहा असल्याची जाणीव झाली.
View this post on Instagram
आलिया म्हणाली, ‘मी पोर्तुगाल याठिकाणी होती. दुसऱ्या दिवशी मला शुटसाठी जायचं होतं. म्हणून मी झोपयची तयारी करत होती. तेव्हा माझ्या पोटात काहीतरी जाणवलं. मला काही कळतंच नव्हतं. पण नंतर मझ्या लक्षात आलं ही राहा असल्याची जाणीव आहे.’
‘कदाचित तिने पहिल्यांदा किक केलं असेल. मी पुन्हा प्रतीक्षा करत होती की, राहा पुन्हा किक मारेल आणि मला अनुभवता येईल… पण असं काही झालंच नाही. मी रात्री रणबीरला कॉल केला. रणबीर मुंबईत होता. त्याला मी फोन केला आणि सांगितलं. तो झोपेत असल्यामुळे ओके… चांगली गोष्ट आहे असं म्हणाला आणि झोपला… पण मला पूर्ण रात्र झोप लागली नाही. कारण मी आनंदी होती…’ असं आलिया म्हणाली.
घरातील भांडणांबद्दल आलिया काय म्हणाली?
राहाने पहिल्यांदा मम्मा शब्द बोलल्यानंतर काय झालं? आलिय म्हणाली, ‘मी आणि राहा घरी एकट्याच होतो. खेळत होतो… तेव्हा राहा मला मम्मा म्हणाली. याआधी घरात भांडणं व्हायची राहा मम्मा बोलेल की पापा? रणबीर म्हणायचा पापा आणि मी म्हणायची मम्मा!’
‘राहा मला मम्मा म्हणाली… पण तेव्हा घरी कोणीच नव्हतं. अशात मी माझा फोन काढला आणि राहाला पुन्हा मम्मा बोलायला सांगितलं… सुरुवातील राहा ममम करु लागली. पण नंतर की मम्मा म्हाणाली… राहाचा तो व्हिडीओ आजही माझ्याकडे आहे…’ असं देखील आलिया भट्ट म्हणाली.