संकटाला धावून येणाऱ्या सोनू सूदच्या नावाने ॲम्बुलन्स सेवा सुरु, अशा प्रकारे करणार लोकांची मदत
कोरोनाच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती.
हैदराबाद : कोरोनाच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता. आता हैदराबादमधील एका व्यक्तीने सोनू सूदच्या नावाने विनामूल्य ॲम्बुलन्स सेवा सुरू केली आहे. याचे उद्घाटन करण्यासाठी स्वत : सोनू सूद उपस्थित होता. (Ambulance service started in the name of Sonu Sood)
Our first step…. Miles to go.
Thank you sir. https://t.co/K2dTpTJWhR
— sonu sood (@SonuSood) January 20, 2021
हैदराबादमध्ये सोनू सूदच्या नावाने ही मोफत सेवा सुरू करण्यात आली असून रुग्णांसाठी ही खास सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेची माहिती स्वत: सोनूने सोशल मीडियावर शेअर केली आहे उद्घाटनाचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले आहे की, ही आमची पहिली पायरी…अजून खूप दूर जायचे आहे
अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊन काळात गरजूंना मदत केली होती. सोनू सूदच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी रोहित पवारांनी जून महिन्यात सूदच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोहोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली होती. “तुम्हाला भेटून आनंद झाला भाऊ. चांगले काम चालू ठेवा. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. प्रत्येक स्थलांतरितासाठी उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटची स्थलांतरित व्यक्ती घरी पोहचेपर्यंत मी परिश्रम घेत राहीन” अशा शब्दात सोनूने रोहितचे आभार व्यक्त केले.
संबंधित बातम्या :
Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
मोठी बातमी : सोनू सूदच्या इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पालिकेच्या रडारवर; BMC ची पोलिसांकडे तक्रार
(Ambulance service started in the name of Sonu Sood)