Ameesha Patel | ‘तिची फिगरच तशी’; बिपाशा बासू विरुद्ध आमिषा पटेलचा जुना वाद पुन्हा पेटला

याच मुलाखतीत अमीषाने सांगितलं की कशा प्रकारे तिने 'थोडा प्यार थोडा मॅजिक' या चित्रपटातील 'लेझी लम्हें' गाण्यात बिकिनी घालण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे तिने यावरही जोर दिला की ती यशराज फिल्म्सची अशी पहिली अभिनेत्री होती, जिच्याकडे नकार देण्याची हिंमत होती.

Ameesha Patel | 'तिची फिगरच तशी'; बिपाशा बासू विरुद्ध आमिषा पटेलचा जुना वाद पुन्हा पेटला
Ameesha and BipashaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 2:11 PM

मुंबई : अभिनेत्री अमीषा पटेल लवकरच ‘गदर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘गदर 2’च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अमीषाने अभिनेत्री बिपाशा बासूबद्दल केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अमीषाने काही वर्षांपूर्वी ‘जिस्म’ या चित्रपटातील भूमिकेवरून बिपाशावर निशाणा साधला होता. “मी इतकी बोल्ड भूमिका कधीच साकारू शकणार नाही”, असं अमीषा म्हणाली होती. त्यावर बिपाशानेही तिला सडेतोड उत्तर दिलं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर अमीषा त्या वादावर पुन्हा व्यक्त झाली. त्याचप्रमाणे बिपाशाबद्दल ती जे म्हणाली होती, त्यावर ठाम असल्याचं अमीषा म्हणाली.

हा वाद तेव्हा झाला होता, जेव्हा जॉन अब्राहम आणि बिपाशा बासूचा ‘जिस्म’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अमीषा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. या शोमध्ये अमीषाने बिपाशाच्या दिसण्यावरून कमेंट केली होती. “मी जिस्मसारखा चित्रपट कधीच केलाच नसता, कारण माझी आजी माझ्यावर नाराज झाली असती”, असं अमीषा म्हणाली होती.

हे सुद्धा वाचा

नंतर जेव्हा 2005 मध्ये बिपाशा आणि लारा दत्ता ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पाहुणे म्हणून आले, तेव्हा बिपाशाने अमीषाच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली होती. तिने म्हटलं होतं, “मी सर्वांत आधी हेच म्हणेन की अमीषामध्ये जिस्मसारख्या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी आवश्यक ते शारीरिक गुण नाहीत. ही माझी फार प्रामाणिक प्रतिक्रिया आहे. मी तिला जिस्म या चित्रपटातील भूमिकेसाठी निवडलं नसतं. एक महिला म्हणून तुम्हाला ‘संपूर्ण पॅकेज’ असावं लागतं. शारीरिकदृष्ट्याच नाही तर तुमच्याकडे मजबूत व्यक्तीमत्त्वसुद्धा असावं लागतं. माझ्या मते तशा भूमिकेसाठी ती फारच बारिक आणि छोटी आहे. तिच्या संपूर्ण शरीराची रचनाच चुकीची आहे.”

आता अनेक वर्षांनंतर अमीषाने बिपाशाच्या या कमेंटवर उत्तर दिलं आहे. “मी जे त्यावेळी म्हटलं होतं, त्यावर आजही ठाम आहे. शेरॉन स्टोन ही एक देवी आहे. जिस्म हा चांगला चित्रपट होता. त्यात दमदार संगीत आणि उत्तम अभिनय होतं. मी फक्त इतकंच म्हणतेय की बिपाशा चित्रपटात का होती, कारण शेरॉन स्टोन बनण्यासाठी मी कम्फर्टेबल नव्हते. ती बनवण्यासाठी हिंमतीची गरज असते, असं मला वाटतं. शारीरिकदृष्ट्याही बोल्ड असावं लागतं. मला सेक्सी किंवा हॉट म्हणू शकता, पण स्क्रीनवर मी बोल्डनेस आणि अंगप्रदर्शनासाठी कम्फर्टेबल नाही”, असं अमीषा म्हणाली.

याच मुलाखतीत अमीषाने सांगितलं की कशा प्रकारे तिने ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’ या चित्रपटातील ‘लेझी लम्हें’ गाण्यात बिकिनी घालण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे तिने यावरही जोर दिला की ती यशराज फिल्म्सची अशी पहिली अभिनेत्री होती, जिच्याकडे नकार देण्याची हिंमत होती. म्हणूनच लेझी लम्हें या गाण्यात बिकिनी टॉपसोबत हॉट पँट निवडलं गेल्याचं तिने सांगितलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.