Ira Khan Video | मी ठीक आहे, पण मला रडू कोसळतंय, आमीरची मुलगी इरा खानचं डिप्रेशनशी द्वंद्व

इरा खानने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वांसमोर येऊन मानसिक आरोग्यावर भाष्य केलं होतं (Amir Khan Daughter Ira Khan depression)

Ira Khan Video | मी ठीक आहे, पण मला रडू कोसळतंय, आमीरची मुलगी इरा खानचं डिप्रेशनशी द्वंद्व
आमीर खानची मुलगी इरा खानचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 9:59 AM

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्टर आमीर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) चुलतभाऊ झेन मारीच्या लग्नातील फोटोंमुळे सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोतून हसरी-खेळकर दिसणारी इरा मानसिकदृष्ट्या मोठ्या वादळाला सामोरी जात आहे. लग्नाच्या काळात नैराश्याशी कसा संघर्ष केला, हे इराने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. (Amir Khan Daughter Ira Khan opens up on coping with depression at cousin’s wedding)

गेल्या काही काळापासून आपल्याला बरं वाटत नाहीये. मला बरेचदा रडू कोसळतं. कामावर जा, रडा आणि झोपा हे करण्यातच बरेच दिवस गेले, असं इरा सांगते.

मानसिक आरोग्य दिनी इराचा पुढाकार

इरा खानने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सर्वांसमोर येऊन मानसिक आरोग्यावर भाष्य केलं होतं. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने तिने क्लिनिकल डिप्रेशनशी सामना करतानाचा आपला अनुभव कथित केला होता. मानसिक आरोग्याबद्दल आपल्याला अधिकाधिक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करायचे आहेत. पण आपल्याला निराश वाटतंय, असं इराने सांगितलं.

भावाच्या लग्नात उसनं अवसान

आपल्या भावाच्या लग्नातील किस्से इराने सांगितले आहेत. मी माझ्या खऱ्या भावना दडपून ठेवल्या. मी नवदाम्पत्यासाठी खुश होते, पण फोटोसाठी मला चेहऱ्यावर उसनं हसू आणावं लागत होतं. दिवसभर बेडमध्ये बसण्याऐवजी लग्नाच्या विधींमध्ये सहभागी व्हावं लागत होतं, असंही इराने व्हिडीओमध्ये सांगितलं.

इरा खानच्या नव्या व्हिडीओत काय?

“चेतावनी : हा आनंदी, सकारात्मक व्हिडीओ नाही. पण हा दुःखद, नकारात्मकही नाही, मात्र मी आहे (नकारात्मक) आणि तुम्हीही लो फील करत असाल, तर कदाचित हा व्हिडीओ तुम्ही पाहायसला नको. तुम्हीच ठरवा. मी अक्षरशः पुटपुटत आहे. पुढच्या वेळी याबद्दल अधिक काळजी घेईन” असं कॅप्शन इराने व्हिडीओला दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

ऑक्टोबरमध्येही इराचा व्हिडीओ

हाय, मी डिप्रेस्ड आहे. आता याला चार वर्ष झाली असतील. मी डॉक्टरांकडे गेले आहे. क्लिनिकल डिप्रेशन आहे. सध्या मी बरी आहे. गेल्या वर्षभरापासून मला मानसिक स्वास्थ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. मी तुम्हाला माझा प्रवास सांगते, असं इराने ऑक्टोबरमध्ये व्हिडीओ शेअर करत सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

Ira Khan | नव्या नात्यामुळे आमिर खानची लेक पुन्हा चर्चेत, कोण आहे इरा खानचा हा नवा बॉयफ्रेंड?

बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक खुलासा

(Amir Khan Daughter Ira Khan opens up on coping with depression at cousin’s wedding)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.