Seema haider | ‘मेने तुमसे सच्चा प्यार किया हैं सचिन’, सीमाच्या चित्रपटाची ऑडिशन क्लिप व्हायरल, VIDEO
Seema haider Love Story | सीमा हैदरच्या रोलसाठी देशभरातून तरुणी ऑडिशन द्यायला येत आहेत. कुठला प्रोडक्शन हाऊस सीमावरील चित्रपटाची निर्मिती करणार आहे?. या चित्रपटाच नाव काय आहे? क्लिप खूप व्हायरल झाली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानातून पळून भारतात आलेल्या सीमा हैदरला कोण ओळखत नाही?. भारतात राहणाऱ्या सचिन मीणासोबतची लव्ह स्टोरी प्रत्येक गल्ली, नाक्यावर फेमस झालीय. सीमा हैदर सोशल मीडियावर लोकप्रिय झालीय. बऱ्याच चॅनल्सना तिने मुलाखती दिल्या. आता तिच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट बनणार आहे. ‘कराची टू नोएडा’ असं या चित्रपटाच नाव आहे. JANI FIREFOX (जानी फायरफॉक्स) प्रोडक्शन हाऊसचे मॅनेजिंग डायरेक्टकर अमित जानी या विषयावर चित्रपट बनवत आहेत. 8 ऑगस्टला अमित जानी यांनी या बद्दल माहिती दिली.
आता एक दिवसानंतर चित्रपटासाठी ऑडिशन्स सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियावर एक क्लिप खूप व्हायरल झाली आहे.
सीमाचा रोल मिळवण्यासाठी स्पर्धा
प्रोडक्शन हाऊसने एक ऑडिशन क्लिप रिलीज केलीय. त्यात एक मुलगी फोनवर सचिनशी बोलताना दिसतेय. सोबत जो मुलगा उभा आहे, तो सचिनची ऑडिशन देण्यासाठी आला आहे. सीमा हैदरचा रोल मिळण्यासाठी देशभरातून मुली ऑडिशन देण्यासाठी येत आहेत. व्हिडिओमध्ये जी मुलगी फोनवर बोलताना दिसतेय, ती जवळपास सीमा हैदरशी मिळती-जुळती आहे.
सीमा हैदर कुठल्या चित्रपटातून डेब्यु करणार?
आधी अशी बातमी येत होती, की सीमा हैदर स्वत: ‘कराची टू नोएडा’ चित्रपटात लीड रोल करेल. सीमा आणि प्रोडक्शन हाऊसने अजून या बद्दल काही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. एक मात्र खरं आहे, सीमा आपला अभिनयाचा डेब्यु करणार. राजस्थान उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येवर चित्रपट बनत आहे. ‘A Tailor Murder Story’ या चित्रपटाच नाव आहे. या चित्रपटात सीमा हैदर ‘RAW’ एजंटची भूमिका करताना दिसणार आहे.
सीमा हैदर और सचिन की प्रेम कथा पे बनने जा रही “कराची टू नोएडा” के लिए आज जानी फ़ायर फॉक्स प्रोडक्शन ने ऑडिशन का वीडियो जारी किया। सीमा हैदर के रोल के लिए देश भर से ऑडिशन शुरू हुआ। pic.twitter.com/6BnmwBj6Eu
— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) August 9, 2023
आता सीमाला फक्त क्लीन चीट मिळण्याची प्रतिक्षा
सचिन-सीमाच्या प्रेम कथेवर बनणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ चित्रपटासाठी पुढच्या काही आठवड्यात अमित जानी थीम सॉन्ग लाँच करणार आहेत. मागच्या आठवड्यात फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसने नोएडामध्ये जाऊन सीमा-सचिनची भेट घेतली होती. सीमाची ऑडिशन घेण्यात आली होती. सीमाने हे ऑडिशन ‘A Tailor Murder Story’ चित्रपटासाठी दिलं होतं. आता फक्त UP ATS कडून सीमा हैदरला क्लीन चीट मिळणं बाकी आहे.