जया बच्चन यांची ‘जाऊबाई जोरात’, अभिताभ बच्चन यांच्या वहिनीपुढे अभिनेत्री देखील फेल, करतात तरी काय?
Amitabh Bachchan Family: अमिताभ बच्चन यांचे लहान भाऊ आणि त्यांची पत्नी... यांच्याबद्दल फार कोणाला नाही माहिती, बिग बींच्या भावाच्या बायको समोर प्रसिद्ध अभिनेत्रींचं सौंदर्य फेल, आहेत गडगंज श्रीमंत... जाणून व्हाल थक्क

Amitabh Bachchan Family: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बिग बींचं कुटुंब बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन, नातवंड नव्या नवेली, आगस्त्या नंदा आणि आराध्या बच्चन यांच्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण अमिताभ बच्चन यांचे लहान भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कोणाला माहिती नाही. आज अमिताभ बच्चन यांचे लहान भाऊ अजिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नीबद्दल जाणून घेवू.
अमिताभ बच्चन हे हरिवंश राय बच्चन आणि तेजी बच्चन यांचे मोठे पूत्र आहेत. तर अजिताभ बच्चन लहान आहे. अमिताभ आणि अजिताभ यांनी स्वतःच्या करीयरचे मार्ग निवडले आणि यशाच्या शिखरावर विराजमान झाले. आज अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. तर त्यांचे लहान भाऊ अजिताभ बच्चन प्रसिद्ध उद्योजक आहेत. पुढे जाऊन अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं. तर लहान भावाच्या लव्हस्टोरीमध्ये देखील बिग बींचं मोठं योगदान आहे.
अजिताभ यांच्या पत्नीचं नाव रमोला असं आहे. पूर्वी रमोला आणि अमिताभ यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. अमिताभ बच्चन स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हापासून रमोला यांच्यासोबत बिग बींची चांगली मैत्री आहे. अशात अजिताभ आणि रमोला यांची मैत्री झाली आणि कालांतराने दोघांचं नातं प्रेमात बदललं. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
या काळात, बिग बी यांनी त्यांचा भाऊ अजिताभ आणि रामोलाचे लग्न करण्यात मदत करून मॅचमेकरची भूमिका बजावली. रमोला आणि अजिताभ यांच्या लग्नानंतर, या जोडप्याला चार मुले झाली, ज्यात तीन मुली, नीलिमा, नैना, नम्रता आणि एक मुलगा भीम बच्चन यांचा समावेश आहे.
भावाच्या मुलांसाबोत देखील बिग बी यांचे चांगले संबंध आहे. रमोला म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमची मुलं आनंदी असतात. मुलं त्यांनी मोठे बाबा म्हणून हाक मारतात आणि त्यांचा सन्मान करतात. पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत मुलांचं मैत्रीपूर्ण नातं आहे. ते सर्व एकत्र आनंदाने क्षण घालवत असतात…’
रमोला यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या इंग्लंड येथील प्रसिद्ध वकील आणि उद्योजिका आहेत. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्या सेंट लुईस येथील वेबस्टर विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनात पदवी मिळविण्यासाठी अमेरिकेत गेल्या. पण रमोला प्रसिद्धीपासून दूर असतात. व्यवसाय आणि कायद्याव्यतिरिक्त, रामोला एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर देखील आहेत. त्या कॉन्सेप्ट्स आणि फर्स्ट रिसॉर्ट या दोन ब्रँडच्या मालकीण आहे. फॅशन लेबल चालवणाऱ्या रमोला स्वतः खूपच स्टायलिश आहेत.